नवी दिल्ली (वर्षा चव्हाण) : ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील चार प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांनी बचत खात्यांवरील किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची अट रद्द केली आहे. त्यामुळे बँक खात्यात ठराविक रक्कम न ठेवता देखील आता बचत खातं सुरू ठेवता येणार आहे.
इंडियन बँकेचा नवा निर्णय
इंडियन बँकेनं 7 जुलै 2025 पासून त्यांच्या सर्व प्रकारच्या बचत खात्यांसाठी किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचा नियम रद्द केला आहे. या निर्णयामुळे आता ग्राहकांना खात्यात ठराविक रक्कम न ठेवता देखील सेवा मिळणार आहेत.
या बँकांनी आधीच दिला आहे दिलासा
1. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) : मार्च 2020 पासूनच सर्व बचत खात्यांवरील किमान शिल्लक रक्कम नियम रद्द.
2. कॅनरा बँक : मे 2025 पासून दंड रद्द करत नियम शिथील केला.
3. पंजाब नॅशनल बँक (PNB) : 1 जुलै 2025 पासून किमान शिल्लक रक्कम नियम रद्द.
या चार बँकांच्या निर्णयामुळे कोट्यवधी ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. यामुळे विशेषतः लहान ठेवी करणारे, ग्रामीण भागातील ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोठा फायदा होणार आहे.
ग्राहकांसाठी काय अर्थ?
किमान शिल्लक न ठेवल्यास दंड भरण्याची गरज नाही.
बँक खातं अधिक लवचिक आणि सुलभ.
आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणि बचतीला प्रोत्साहन.
या निर्णयामुळे इतर बँकांवरही दबाव येण्याची शक्यता आहे, आणि भविष्यात आणखी काही बँका अशीच पावलं उचलतील, अशी अपेक्षा ग्राहक व्यक्त करत आहेत.