डॉक्टर डे : डॉक्टरांचे समाजासाठी असलेले योगदान मोठे आणि त्यांनी सतत समाजाची आरोग्य सेवा केलेली असते - लायन रवींद्र काळे


लायन्स क्लब पिंपरी चिंचवड कॉर्पोरेट ने केला डॉक्टर डे साजरा

पिंपरी चिंचवड : डॉक्टर डे निमित्ताने लायन्स क्लब पिंपरी चिंचवड कॉर्पोरेट चे वतीने  प्रेसिडेंट लायन रवींद्र काळे, सेक्रेटरी लायन अनिल गालिंदे, खजिनदार लायन गजानन चिंचवड़े, लायन पुरुषोत्तम डबीर,  लायन मोहन लोंढे, लायन हंबीरराव आवटे, लायन लिखितकर यांचे उपस्थितीत

शहरातील प्रमुख मान्यवर डॉक्टर याना समक्ष भेटून  पुष्प गुच्छ व प्रमाणपत्र देऊन सम्मानित करण्यात आले.

१) लायन डॉ. अमरसिंह निकम 

२) डॉ. मनीष निकम 

३) डॉ. सुचित्रा निकम 

४) डॉ. मानसी निकम 

५) डॉ. भोसकर 

७) डॉ. गौरी भोसकर 

८) लायन डॉ. राजेश चावट 

९)डॉ. प्रवीण रोहकले 

१०) डॉ. योगिता रोहकले 

११) डॉ. निशिकांत कुलकर्णी

१२) डॉ. प्रतिभा कुलकर्णी



सन्मान करताना सर्व डॉक्टरच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली 

डॉक्टर्स डे निमित्त लायन्स क्लब पिंपरी चिंचवड कॉर्पोरेटचे अध्यक्ष लायन रवींद्र काळे म्हणाले की, डॉक्टरांचे समाजासाठी असलेले योगदान मोठे  आणि त्यांनी सतत समाजाची आरोग्य सेवा केलेली असते, आपल्या समाजात डॉक्टरांना मोठा सन्मान दिला जातो. तो जीवनाचा रक्षणकर्ता मानला जातो. अलीकडेच, कोरोना महामारीच्या काळात जगभरातील डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता पीडितांवर उपचार केले आहेत. त्यांचा गौरव आणि सन्मान करणे आमचे कर्तव्य आहे.

यावेळी  प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन डॉक्टर्सना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी आपल्या क्लबचे अध्यक्ष रवींद्र काळे व नूतन लायन सभासद वासंती काळे हजर होते.


थोडे नवीन जरा जुने