Apache RTR 310 : टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या लोकप्रिय नेकेड स्पोर्ट्स बाईक Apache RTR 310 चे अपडेटेड मॉडेल भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केले आहे. अधिक आकर्षक डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्पोर्टी लुकसह ही बाईक आता नव्या अवतारात ग्राहकांसमोर आली आहे. कंपनीच्या मते, Apache RTR 310 ही बाईक टीव्हीएसच्या चार दशकांच्या रेसिंग अनुभवावर आधारित तयार करण्यात आली आहे.
Apache RTR 310 ची खास वैशिष्ट्ये
नवीन Apache RTR 310 मध्ये अनेक अशा वैशिष्ट्यांचा समावेश आहे, जे या सेगमेंटमध्ये प्रथमच पाहायला मिळत आहेत. यामध्ये पारदर्शक क्लच कव्हर दिला आहे, ज्याद्वारे क्लचचे हालचाल दृश्य रूपात पाहता येते. यासोबतच, ही बाईक कीलेस इग्निशन सह येते, म्हणजे ती चावीशिवाय सुरू करता येते.
यात ड्रॅग टॉर्क कंट्रोल आणि कॉर्नरिंग ड्रॅग टॉर्क कंट्रोल या दोन महत्त्वाच्या सुरक्षा फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. हे फीचर्स बाईकला अचानक झटके किंवा वळणांवर घसरण्यापासून सुरक्षित ठेवतात. याशिवाय लाँच कंट्रोल फीचरही यात उपलब्ध आहे, जे जलद अॅक्सिलरेशनसाठी उपयुक्त आहे.
टेक्नोलॉजी आणि कस्टमायझेशन
Apache RTR 310 बाईक OBD2B मानकांनुसार तयार करण्यात आली आहे, म्हणजेच ती उत्सर्जन नियमांशी सुसंगत आहे. याशिवाय, यात स्मार्ट डिजिटल फीचर्सचा समावेश असून, युजर्सना कनेक्टेड राइडिंगचा अनुभव मिळतो. विशेष म्हणजे, ही बाईक Build To Order (BTO) पर्यायात देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये ग्राहक स्वतःच्या पसंतीनुसार बाईकचे कस्टमायझेशन करू शकतात.
Apache RTR 310 बाईकची किंमत
बेस व्हेरिएंट: ₹2,39,990 (एक्स-शोरूम)
टॉप व्हेरिएंट: ₹2,57,000 (एक्स-शोरूम)
BTO मॉडेल: ₹2,75,000 पासून (एक्स-शोरूम)
टीव्हीएसच्या या नवीन मॉडेलने भारतातील प्रीमियम नेकेड बाईक सेगमेंटमध्ये एक वेगळा मानदंड निर्माण केला आहे. अत्याधुनिक फिचर्ससह ही बाईक तरुण रायडर्ससाठी आकर्षण ठरू शकते. जर तुम्ही एक परफॉर्मन्स आणि टेक्नोलॉजी यांचा उत्तम संगम शोधत असाल, तर Apache RTR 310 तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते.
TVS-launches-updated-model-of-Apache-RTR-310-sporty-look-with-awesome-features
.png)