बारामती : १५ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण भारतामध्ये ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. आणि याच दिवशी ७९ मिनिट नॉन स्टॉप स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्ड attempt बारामती मध्ये केला गेला. हे वर्ल्ड रेकॉर्ड १ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका बुक वर्ल्ड रेकॉर्ड, २ जीनियस इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, ३ यु एन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या तीन बुक्ससाठी वर्ल्ड रेकॉर्ड केले गेले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपल्या सैन्य दलाच्या शौर्याला आणि बलिदानाला आदरांजली वाहून व त्यांच्या शौर्याला सलाम करून या छोट्या मुलांनी ७९ मिनिट्स नॉनस्टॉप स्केटिंग केले. हे रेकॉर्ड स्केटिंग कोच एकता शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. Vpnems च्या ग्राउंड वर हे रेकॉर्ड प्रिन्सिपल जॉइसी जोसेफ व तेथील स्टाफ यांचे मोलाचे मार्गदर्शन व मदतीने पूर्ण झाले.
यामध्ये पाच वर्षापासून 14 वर्षापर्यंतच्या मुलांनी सहभाग घेतला होता. आपल्या तिरंगी रंगाचे फेटे डोक्याला बांधून शानदारपणे स्केटिंग करत या मुलांनी आपले रेकॉर्ड पूर्ण केले. स्केटिंग करत त्यावर लाठीकाठी, एका पायावर स्केटिंग, झेंड्याला मानवंदना देत या मुलांनी ७९ मिनिट न थकता आपले रेकॉर्ड पूर्ण केले. यामध्ये बारामती मधील यंग अन्त्रोप्रीनर असोसिएशन मेंबर सार्थक शहा ,चिराग शहा आणि अजिंक्य गांधी यांनी या रेकॉर्डसाठी कोलाब्रेशन करत मोलाची साथ दिली. तसेच या मुलांचे पालकही मुलांना उत्साहात प्रोत्साहित करत होते.
79-minutes-of-non-stop-skating-on-the-occasion-of-79th-Republic-Day-Baramati