Alandi : आदर्श सांस्कृतिक संस्थेचे सह्याद्री कॉम्पुटराईज ई सेवा केंद्राचे लोकार्पण


आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील नेवाळे वस्ती चिखली पंचक्रोशीतील नागरिकांच्या सोयीसाठी आदर्श सांस्कृतिक संस्थेचे सह्याद्री कॉम्पुटराईज ई सेवा केंद्राचे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांचे हस्ते मोठ्या उत्साहात हरिनाम गजरात झाले. 

या प्रसंगी मुकुंद जोशी, साहेब नाईक, देवेंद्र गावंडे, सह्याद्री महिला बचत गट, नवशक्ती महिला बचत गट, सरस्वस्ती महिला बचत गट महिला पदाधिकारी, भिलारे परिवार परिसरसतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

  या प्रसंगी हिंगणकर महाराज यांनी महिलांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आजच्या संगणकाचे स्पर्धेचे युगात महिला बचत गट महत्व आणि बचत गटाचे नाते खूप महत्वाचे आहे. बचत गट चालवतांना महिलांची भूमिका श्री छत्रपती शिवराय यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे आदर्श डोळ्या समोर ठेवून कार्यरत राहण्याची असावी. माँ जिजाऊ साहेबांचा आदर्श समाजातील महिलांनी घ्यावा. महिला बचत गटांनी गटाचे विकासाचा विचार करावा. गटास कसा फायदा होईल, यावर लक्ष केंद्रित केल्यास बचत गटातील महिलांच्या कुटुंबाला आधार मिळेल. 

यावेळी त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना मोलाचा सल्ला दिला. स्नेह संवाद साधत त्यांनी मार्गदर्शन केले. परिसरातील गरज ओळखून चिखली पंचक्रोशीतील नागरिकांच्या सोयीसाठी आदर्श सांस्कृतिक संस्थेच्या सह्याद्री कॉम्पुटराईज ई सेवा केंद्राचे  उदघाटन हिंगणकर महाराज यांचे हस्ते झाले.

थोडे नवीन जरा जुने