![]() |
श्री सिद्धेश्वर मंदिरात धार्मिक पर्वणीस भाविकांची गर्दी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात माऊलींचे ७५० व्या जन्मोत्सवास हरिनाम गजरात प्रारंभ झाला आहे. या निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमास तसेच श्रावण महिन्या निमित्त आळंदीतील पुजारात शिवपीठ श्री सिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. यावेळी भाविक शिवभक्तीमय उत्साहात दिसत होते.
मंदिरात १० ते १६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत श्रींचे ७५० व्या जन्मोत्सावाचे कार्यक्रमा निमित्त मोठ्या प्रमाणात मंडप टाकण्याचे काम देवस्थानने हाती घेतले आहे. मुख्य मंदिर शिखर, श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर, श्री मुक्ताई मंदिर, भोजलिंग काका, श्री केसरीनाथ मंदिर शिखरावर, दर्शनबारी, महाद्वार, मंदिर परिसर आदी ठिकाणी विद्युत रोषणाईने मंदिरास सोनेरी तसेच विविध रंगी बेरंगी झळाळी विद्युत रोषणाईची माध्यमातून देण्यात आली आहे. माऊली मंदिरात श्रींचे सुवर्ण कलश उपक्रमास मोठ्या प्रमाणात देणग्या येत असून मंदिरात उपव्यवस्थापक तुकाराम माने यांचे हस्ते देणगीदारांचा श्रींची प्रतिमा, उपरणे, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
जन्मोत्सवात सोमवारी गाथा भजन, डॉ. नारायण महाराज जाधव यांची प्रवचन सेवा, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने ह. भ. प. परमेश्वर महाराज यांची सुश्राव्य कीर्तनसेवा झाली. यावेळी भाविकांनी श्रवण सुखाचा लाभ घेतले.
रात्री भजन सेवा आदी धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. परंपरांचे पालन करीत श्रींचा जन्मोत्सव साजरा होत आहे. आळंदीकर ग्रामस्थ यांचे तर्फे मोठ्या उत्साहात अन्नदान महाप्रसाद वाटप होत आहे. यास मोठा प्रतिसाद ग्रामस्थांनी पुढे येत अन्नदान सेवा भक्तिमय उत्साहात होत आहे.
श्रावणा निमित्त परिसरातील शिव मंदिरांत भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली होती. भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. यावेळी श्रींची पूजा, अभिषेख वेदमंत्र जयघोषात झाले. श्री वैतागेश्वर महाराज, श्री सिद्धेश्वर महाराज, श्री धनेश्वर महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनास गर्दी केली होती.