Alandi : काळूस भागात शेतक-यांचे बेकायदा पुनर्वसन हटविण्याचे मागणीस उपोषण आंदोलन, गेल्या ४ दिवसांपासून आंदोलन सुरु ; आमदार बाबाजी काळे यांनी साधला संवाद



अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा खणखणीत इशारा 

आळंदी (अर्जुन मेदनकर) : माजी कृषी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचे नेतृत्वात शेतक-यांचे बेकायदा पुनर्वसन हटविण्याचे मागणी साठी १५ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत उपोषण आंदोलन काळूस येथील शेतक-यांनी सुरु करण्यात आले आहे. ..... गेल्या ४ दिवसां पासून उपोषण आंदोलन सुरु आहे. खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलन कर्ते यांचेशी संवाद साधला.... येत्या काळात योग्य निर्णय लवकर न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा खणखणीत इशारा आंदोलन कर्त्यांनी दिला आहे.  

 उपोषण कर्त्यांमध्ये सुभाष पवळे, संतोष खलारे, भरत आरगडे, विठ्ठल आरगडे, विश्वनाथ पोटवडे यांचा समावेश आहे. या उपोषण प्रसंगी पाठिंबा देण्यास बाळासाहेब दौडकर, रामदास वाटेकर, सोमनाथ पवळे, सुरेश कौटकर, दत्ता सुक्रे, नवनाथ जाधव, कान्हू वाटेकर, सुशीला पवळे, सुलाबाई पवळे, शालन गायकवाड यांची उपस्थितीत होती. रयत क्रांती शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते गजानन गाडेकर यांचे मार्गदर्शनात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व रयत करणी संघटना आणि खेड तालुक्यातील शेतकरी करीत असल्याचे खेड तालुका अध्यक्ष सुभाष पवळे यांनी सांगितले. या आंदोलनास सुरुवात झाली आहे. गेल्या ४ दिवसां पासून उपोष्ण सुरु आहे. येत्या काळात प्रशासनाने दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल असा खणखणीत इशारा पवळे यांनी दिला आहे. 

 विविध मागण्यात भामा आसखेड व चासकमान धरणाचे संपादित जमिनींना पाणी नसताना गेल्या ४० वर्षा पासून सात बारा वर कब्जेदार सादरी असणारे बेकायदेशीर पुनर्वसन शिक्के काढणे, दाखल दाव्यातीळ निर्देशानुसार बेकायदेशीर पुनर्वसन रद्द करणे, बेकायदेशीर वाटप, खरेदी खाते रद्द करणे, दोषींवर कारवाई करणे, यापूर्वी वगळण्यात आलेल्या जमिनी प्रमाणे येथील जमिनी वगळून अन्याय दूर करावा,  धारण लाभ क्षेत्रात येत नसलेली काळूस सह इतर गवे पुनर्वसन मधून वगळण्यात यावी. यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेल्या आदेशांची अंबलबजावणी करण्यात यावी या मागण्या असल्याचे सुभाष पवळे यांनी सांगितले. 

 आंदोलन स्थळी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी भेट देऊन उपोषण कर्ते यांची चौकशी केली. संवाद साधला. उपोषणकर्ते यांची भूमिका व मागण्या समजून घेत निवेदनावर चर्चा करीत संवाद साधला,

थोडे नवीन जरा जुने