खेड लोकशाही दिनी नागरिकांची गैरसोय; स्थळ बदलल्याने नागरिकांत नाराजी


राजगुरुनगर : खेड लोकशाही दिन नियोजन पूर्व जनजागृती अभावी नागरिकांची गैरसोय खेड तालुका स्तरीय लोकशाही दिनी झाली. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन तहसीलदार कार्यालयात होत असतो. या महिन्याचा लोकशाही दिनी  सोमवारी ( दि. १८ )  खेड तालुक्यातील अर्जदार, नागरिक, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी खेड तहसील कार्यालयात नेहमी प्रमाणे लोकशाही दिनास उपस्थित राहिले. मात्र या ठिकाणी गेल्यानंतर लोकशाही दिन स्थळ बदलले असल्याचे समजले. लोकशाही दिनाच्या अनुषंगाने ठिकाण बदलल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत घटनेचा जाहीर निषेध करीत निवेदन दिले. 

 नागरिकांचे वतीने दिलेले निवेदन खेड नायब तहसीलदार चेतन मोरे यांनी स्वीकारत संवाद साधला. खेड नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन नागरिकांनी झाल्या प्रकार बाबत प्रशासनाचे लक्ष वेधत नागरिकांनी निवेदन दिले.

 यावेळी निवेदन देताना प्रकाश पाचारणे, सुरेश टाकळकर, सतीश चांभारे, सीताराम आरुडे गुरुजी, गोविंद बुट्टे, रोहिदास कदम, दत्तात्रय साबळे, प्रकाश काळे, प्रशांत नगरकर संभाजी पवळे, भिका गाढवे आदी उपस्थित होते.

 यावेळी लोकशाही दिना निमित्त कर्मचारी देखील त्यांना स्थळ बदलल्याचे माहित नसल्यामुळे नेहमी प्रमाणे थेट तहसील कार्यात आले होते. त्यांना ही लोकशाही दिनाचे कार्यक्रमास उपस्थित राहण्यास तारेवरची कसरत करावी लागली. अनेक अर्जदार देखील यावेळी उपस्थित होते. माहे जुलै २०२५ मधील लोकशाही दिनाचे अर्जावर देखील कामकाज न झाल्याने अर्जदार यांनी नाराजी व्यक्त केली. 

लोकशाही दिनाचे आयोजना बाबत जनजागृती करण्याची मागणी करीत नागरिकांनी जाहीर निषेध केला.  

या बाबतचे निवेदन निवासी नायब तहसीलदार खेड तथा कार्यकारी दंडाधिकारी चेतन मोरे यांनी स्वीकारले.

थोडे नवीन जरा जुने