चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

 


PCMC : महा पोलीस मित्र संघाच्या पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप

पिंपरी-चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - महा पोलीस मित्र संघ, महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलय अंतर्गत असलेल्या चिखली पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपत्र वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. चिखली येथील पोलीस ठाण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महा पोलीस मित्र संघाच्या अध्यक्षा श्रीमती अनिता गणेश लष्करे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे दादासाहेब चौधरी तसेच, मार्गदर्शक म्हणून श्री. लक्ष्मण पवार यांनीही उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रसिद्ध निवेदक प्रमोद कुलकर्णी यांनी  मनोगताने उपस्थितांना कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.



यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक  विठ्ठल साळुंखे यांनी 'पोलीस मित्र' या संकल्पनेचे महत्त्व विषद केले. "पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी करून, समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात पोलीस मित्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतात," असे ते म्हणाले. लक्ष्मण पवार यांनीही महा पोलीस मित्र संघाची उद्दिष्ट्ये आणि सामाजिक बांधिलकी यावर मार्गदर्शन केले.पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी सर्वांना संबोधित केले.

याप्रसंगी पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महा पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख अतुल तानाजी बिराजदार, संघटक अमोल रावसाहेब भोसले, सचिव सुभाष शेगर, पुणे जिल्हाध्यक्ष किशोर थोरात, उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र साळुंखे, पुणे जिल्हा सचिव चंद्रकांत घोटमुकले, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गिरीश सातपुते, पुणे जिल्हा संघटक दत्ता गिरी, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख  ऍडव्होकेट/C.A.अभिजित पवार, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रवींद्र बेल्हेकर, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष तेजा हंकारे, पिंपरी चिंचवड उपशहर अध्यक्ष निखिल पडवळ, पिंपरी चिंचवड सहसचिव ऋषभ लांडे तसेच पुणे जिल्हा टीम यांनी केले होते. 

सदर कार्यक्रमास सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा सचिव विजय महाजन व पदाधिकारी विनायक जगताप, मारुती तमवाड यांनीही उपस्थिती दर्शविली.

उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला, आणि अल्पोपहारानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

थोडे नवीन जरा जुने