संतापजनक : EMI थकले म्हणून बँकवाले बायकोला गेले घेऊन

EMI-Loan-Uttar-Pradesh-Banker-took-his-wife-away-because-he-was-late-with-EMI

EMI Loan Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी मायक्रोफायनान्स बँकेने कर्जाचे हप्ते न भरल्याने एका व्यक्तीच्या पत्नीला घेऊन जात तब्बल पाच तास बँकेत ओलिस ठेवल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने बँकांच्या कर्ज वसुली पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा आरोप होत आहे.

झाशी जिल्ह्यातील मोंठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. रविंद्र वर्मा नावाच्या या व्यक्तीने खासगी बँकेकडून ४०,००० रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते, ज्याचा मासिक हप्ता २,१२० रुपये होता. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून या व्यक्तीने हप्ते भरले नव्हते. यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी ३० जुलै २०२५ रोजी संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला जबरदस्तीने बँकेत नेले आणि तिला पाच तासांपेक्षा जास्त काळ बँकेत बसवून ठेवले. बँक कर्मचाऱ्यांनी पतीला स्पष्ट सांगितले की, “हप्ते भरा, तरच तुमची पत्नी सोडू.”

रविंद्र वर्मा याने पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने बँकेत धाव घेतली, तेव्हा बँक कर्मचाऱ्यांनी घाबरून महिलेला सोडले. बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, “महिला स्वतःहून बँकेत बसली होती आणि तिचा पती पैसे गोळा करण्यासाठी बाहेर गेला होता.” मात्र, पीडित दाम्पत्याने हे दावे फेटाळून लावले असून, बँक कर्मचाऱ्यांनी धमक्या दिल्याचा आरोप केला आहे.

पूजा वर्मा यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की, त्यांनी ४०,००० रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते आणि त्याचे ११ हप्ते भरले होते, परंतु बँकेच्या नोंदीनुसार फक्त ८ हप्तेच भरल्याचे दिसत होते. बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी ३ हप्त्यांचे पैसे स्वतःकडे ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.

बँकेच्या कर्ज वसुली पद्धतीवर प्रश्न

ही घटना झाशीपुरती मर्यादित नसून, देशभरात खासगी बँका आणि मायक्रोफायनान्स संस्थांच्या कर्ज वसुली पद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. यापूर्वीही अनेक ठिकाणी बँक एजंट्सनी कर्जदारांना त्रास दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

EMI-Loan-Uttar-Pradesh-Banker-took-his-wife-away-because-he-was-late-with-EMI

थोडे नवीन जरा जुने