आयएमडीकडून कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, कोकण व गोवा येथे अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी


Red alert : गेल्या चार दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस व पुरसदृश्य परिस्थितीमुळे किमान २१ जणांचा बळी गेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण व राज्यातील इतर भागांत सलग चौथ्या दिवशी जोरदार पावसाने हाहाकार माजवला आहे. नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती तीव्र असून तेथे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवामान विभागानुसार (IMD), मुंबईत तब्बल ३०० मिमी पावसाची नोंद झाली असून त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 मुंबई, ठाणे, पालघर,कोकण किनारपट्टी सहा आणि कर्नाटक महाराष्ट्र, गुजरात राज्यासाठी आयएमडीचा पुन्हा रेड अलर्ट दिला असून संपूर्ण राज्यभरात ३०० ते ६००  मिमी पाऊस पडून नागरिक हैराण  झाले.

 भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवार पासून सायंकाळी ४ वाजता मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी नवा ‘रेड अलर्ट’ जारी केला होता,  पुढील तीन तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि ४० ते ६० किमी प्रतितास वेगाच्या वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. याआधी सकाळी १०.१५ वाजता आणि दुपारी १ वाजता असे दोन रेड अलर्ट जारी झाले होते.

मुंबईत सलग ४८ तास झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) जारी केलेल्या दीर्घकालीन लाल इशाऱ्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) १८ व १९ ऑगस्ट रोजी शैक्षणिक संस्था आणि शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचा सल्ला देण्यात आला. आतापर्यंत राज्याच्या विविध शहरात १००० मिमी इतका पाऊस नोंदवला गेला असून अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे 'मॅक्सिमम सिटी' अक्षरशः ठप्प झाली आहे.

वाहतूक ठप्प: मुसळधार पावसामुळे मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड सह राज्यातील आणि उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते ठाणे दरम्यानची रेल्वे वाहतूक तसेच हार्बर लाईनवरील कुर्ला ते CSMT या दरम्यानची सेवा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. मात्र ठाणे–कर्जत, खोपोली आणि कसारा या मार्गांवर शटल सेवा सुरु आहे. शाळा, महाविद्यालये, सरकारी व पालिका कार्यालये आज बंद ठेवण्यात आली आहेत.

आपत्ती व्यवस्थापन:

 एनडीआरएफ व भारतीय सैन्याच्या पथकांची विविध भागांत तैनाती करण्यात आली असून नांदेडसह अनेक ठिकाणी पूरबाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. राज्यभरात सुमारे दहा लाख हेक्टर क्षेत्रातील खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत.

रेल्वे सेवा सुरू ठेवण्याचे प्रयत्न: मुंबईत रात्रीभर झालेल्या पावसानंतरही पश्चिम रेल्वेने उपनगरीय सेवा अखंड सुरू ठेवली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह यांनी वरिष्ठ अभियंते यांच्यासह चर्चगेट–विरार विभागाची पाहणी करून सेवा सुरू ठेवण्यासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

 मुंबई व परिसरात पुढील काही तास अतिवृष्टीचा धोका असल्याने नागरिकांनी आवश्यक तेथेच बाहेर पडावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांसाठी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या  इशाऱ्यानुसार, पुढील २४ तासांत राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र, २० ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. परंतु गुजरात, कर्नाटक व राज्याच्या काही भागात पुन्हा पावसाची जोरदार शक्यता IMD ने वर्तवली आहे.

१८ ऑगस्ट रोजी आयएमडीने (भारतीय हवामान विभागाने) महाराष्ट्रासाठी हा इशारा दिला. सक्रिय मान्सून परिस्थितीमुळे राज्यात विशेषतः मुंबई आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति-जोरदार पावसाची नोंद होत आहे. ही परिस्थिती आणखी २४ तास कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

१९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे व साताऱ्याच्या घाटमाथ्यांसाठी लाल इशारा जारी करण्यात आल्यानंतर संपूर्ण कोकणपट्टीत ३०० ते ६०० मिमी  पावसाने झोडपले आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवून केशरी (ऑरेंज) इशारा देण्यात आला आहे. राज्यातील वाहतूक ठप्प असून शासकीय यंत्रणा नागरिकांना मदत करत आहेत.

गेल्या २४ तासात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिमी)

ताम्हिणी - ५७५ मिमी
भिरा - ५६८
लोणावळा (टाटा) - ४१८
लोणावळा (आॅफिस) - ३९०
माथेरान - ४३८
महाबळेश्वर - ३०१
शिरगाव - ४३०
शिरोटा - १८५
ठाकूरवाडी - १३६
वळवण - २७१
अम्बोणे ३३८
भिवपूरी - २२०
डोंगरवाडी - ३७३
कोयना (नवजा) ३१६
कोयना (पोफळी) २६६
खोपोली - ३०५
धारावी - १४२
वैतरणा - १७७
तानसा - १८४
तुलसी - २९६
विहार - २८७
भातसा - १६३
ठाणे - १९५
गिरीवन - १६८
शिवाजीनगर - ६०
सातांक्रुझ - २०९
डहाणु - १५१ मिमी

पुण्यासाठी पुन्हा तुलनेने तीव्र पावसाचा अंदाज असून त्यासाठी पिवळा (यलो) इशारा देण्यात आला आहे. मात्र, २१ ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. बुधवारपासून राज्यातील बहुतेक भागांमध्ये, त्यात पुण्याचाही समावेश असून, फक्त अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे आणि कोणताही मोठा इशारा लागू राहणार नाही.

थोडे नवीन जरा जुने