Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना रक्षाबंधन पूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा मिळून दोन हप्त्यांचा लाभ मिळणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते, आणि रक्षाबंधनाच्या सणापूर्वी दोन महिन्यांचा एकत्रित लाभ दिला जाणार आहे.
राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला एक भेट मिळणार आहे. जुलै-ऑगस्ट असे दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकत्रच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे. मात्र ते पैसे नेमक कधी येणार याची अधिकृत तारीख अद्याप समोर आलेली नाही.
लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच हे पैसे जमा होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून तसे झाल्यास महिलांना 3000 रुपये एकत्र मिळाल्याने त्यांचा राखीचा सण मात्र चांगलाच आनंदात जाईल असं दिसतंय.
अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई
योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी सरकारने अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू केली आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाने 26 लाख लाभार्थ्यांची माहिती तपासली असून, त्यापैकी 5 लाख महिला नवीन निकषांनुसार अपात्र ठरल्या आहेत. यामध्ये दुहेरी लाभ घेणाऱ्या (उदा., नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतील लाभार्थी) आणि सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतन घेणाऱ्या कुटुंबातील महिला यांचा समावेश आहे. तसेच, 14,298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात लाडकी बहीण योजनेची रक्कम 1,500 वरून 2,100 रुपये प्रति महिना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत नव्याने कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Ladki-Bahin-Yojana-Beloved-sisters-will-get-two-months-of-benefits-on-occasion-Raksha-Bandhan