Maval : श्री. भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, वहानगाव मावळ येथे वृक्षारोपण

 


मावळ - वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती ll धृ ll

येण सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत ll १ll

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वरील अभंगाला अनुसरून मे. केएसपीजी ऑटोमोटीव्ह इंडिया प्रा. ली. टाकवे बु. #Rheinmetall या कंपनीच्या माध्यमातून श्री. भैरवनाथ माध्यमिक विद्यालय वहानगाव, मावळ येथे वृक्षारोपण व सर्व शिक्षकवृंद तसेच सर्व विद्यार्थी यांना वृक्षांचे वाटप करण्यात आले. तसेच वहानगाव येथील पोलीस चौकी समोरही वृक्ष लावण्यात आले. 

#Rheinmetall - #KSPG_AUTOMOTIVE_INDIA_PVT_LTD. टाकवे बु. या कंपनीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. 

वृक्षारोपणाच्या निमित्ताने कंपनीतील पदाधिकाऱ्यांनी विद्यालयाला भेट दिली. 

रविराज भोसले (Welfare Officer, HR), दशरथ शेवाळे (Security Officer), अमेय काजळे (EHS), आणि श्री. अमोल पाटील (Utility & Facility) यावेळी उपस्थित होते.


या प्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वतीने फळझाडांची रोपे वाटप करण्यात आली. तसेच विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमावेळी विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करत केले. तसेच विद्यालयाने अनेक चांगले उपक्रम राबवून मिळविलेल्या यशाबद्दल विद्यालयाचे कौतुक केले. 

वृक्षारोपणाचा कार्यक्रम भैरवनाथ माध्यमिक विद्यालय येथे आयोजित केल्या बद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक विनय कसबे सर यांनी कंपनी व्यवस्थापन व सामाजिक कार्यकर्ते बळीराम शिंदे आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सहसचिव  किरण शिंदे, श्री. संजय शेंडगे यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आल्याने त्यांचे विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात केले.

थोडे नवीन जरा जुने