पिंपरी चिंचवड : चिंचवड येथील तनिषा हाडोळे हिने जेईई B.Arch 2025 या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत 99.99 पर्सेंटाईल आणि भारतात चौथा क्रमांक मिळवत शहराचा गौरव वाढविला आहे. या उल्लेखनीय यशामुळे तिला प्रतिष्ठित स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर (SPA), दिल्ली मध्ये प्रवेश मिळाला आहे.
एआयसीटी डिझाईन अकॅडमी तर्फे आयोजित सत्कार समारंभात तनिषा हाडोळे, नयन गावित,नुपूर वडाळकर, सृष्टी नाईक,ऋतुजा वाघ आणि इतर अनेक विद्यार्थ्यांचे सत्कार संचालक राजेश सप्रा आणि लीना सप्रा यांच्या हस्ते करण्यात आला. तनिषाने आपल्या यशाचे श्रेय नियोजनबद्ध अभ्यासक्रम, सतत घेतले जाणारे सराव परीक्षा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांना दिले.
> “हे यश शक्य झाले कारण मला येथे सातत्याने मार्गदर्शन, प्रेरणा आणि योग्य अभ्यास दिशा मिळाली,” असे तनिषा म्हणाली.
तनिषासोबतच नयन गावित या विद्यार्थिनी लाही SPA दिल्ली येथे प्रवेश मिळाला आहे आणि विद्यार्थिनी नुपूर वडाळकरला सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई मध्ये प्रवेश मिळाला.
गेल्या काही वर्षांपासून एआय सीटी डिझाईन अकॅडमी हे देश-विदेशातील विद्यार्थ्यांसाठी आर्किटेक्चर करिअरचा विश्वासार्ह पाया ठरत आहे. गतवर्षी मैत्रेयी खंडागळे हिने दुबईतून ऑनलाइन प्रशिक्षण घेत जेईई B.Arch उत्तीर्ण होत SPA भोपाळ मध्ये प्रवेश मिळवला होता. यंदा देखील ही परंपरा कायम ठेवत दुबईतील ईशान जैन याने उत्कृष्ट गुण मिळवून SPA भोपाळमध्ये प्रवेश मिळवला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना एआयसीटी डिझाईन अकॅडमीचे संचालक श्री. राजेश सप्रा म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर स्वप्नं साकार केली आहेत. त्यांचा निर्धार आणि क्षमता भविष्यात नक्कीच त्यांना उच्च शिखरे गाठायला मदत करेल.”