लोणावळा : महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यात मुंबई–पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी काही मद्यधुंद महिलांमध्ये जोरदार भांडण उफाळून आले. हा राडा रस्त्यावरच झाल्याने वाहतूक ठप्प झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये महिला एकमेकींचे केस ओढताना, आरडाओरड करताना दिसत आहेत. गर्दीत उभ्या असलेल्या लोकांनी त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कोणाचंच ऐकून घेतलं नाही.
साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, महिलांचा राडा एवढा वाढला की महामार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाली. या घटनेचे अनेक स्थानिकांनी मोबाईलवर चित्रीकरण केले.
माहिती मिळताच वाहतूक पोलिस घटनास्थळी धावले; मात्र महिलांनी पोलिसांच्या इशाऱ्यालाही भीक घातली नाही. काही वेळाने स्थानिक दुकानदारांच्या मदतीने त्या महिलांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
फ्री-स्टाईल महिलांची हाणामारी लोणावळाकरांना बघायला मिळाली. या महिला आणि त्यांचे मित्र पर्यटक असावेत त्यांनी खूप दारू प्राशन केली होती
नशेत रस्त्यावर उतरल्या… आणि एकमेकींना मारहाण करत अक्षरशः कुस्ती सुरू केली होती.
दिवसाढवळ्या पुणे मुंबई रास्ता त्यांनी जाम करून ठेवला होता. त्यांच्या या असभ्य वर्तनाचा नेटकरी निषेध करत आहेत.