PCMC : शिवशाही व्यापारी संघ कामगार आघाडीच्या नामफलकाचे उद्घाटन बापूसाहेब घोलप यांच्या हस्ते


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार, निगडी अंकुश चौक येथे शिवशाही व्यापारी संघ कामगार आघाडी च्या नामफलकाचे उद्घाटन उद्योजक बापूसाहेब घोलप व संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी गणेश दादा कलवले यांची संघाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या उद्घाटन समारंभाला जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, नामदेव रिटे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, सचिव सुरज आण्णा कांबळे, उपनेत्या उषा कांबळे, शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, वाहतूक आघाडी अध्यक्ष अनिल तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.


नवीन नियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे:

निगडी विभाग अध्यक्ष – माणिक माने

उपाध्यक्ष – सलीम भाई शेख

खजिनदार – शंकर आव्हाड

सचिव – अजय डोळस

कार्याध्यक्ष – कुंदन ढगे

सल्लागार – अन्वर सय्यद

सहसचिव – सुरेश भोसले, विशाल मोरे

सदस्य – लहु सोनकांबळे

इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये किरण कांबळे, आयुब खान, सुनिल कांबळे, प्रेम शिंदे, राजेश जाधव, संभाजी पवार, अनिल चौधरी, पवन जगताप, राजेंद्र पवार, राजू मिरेकर, बाबू बनसोडे, सुभाष, सदाशिव, सुमंत जोगदंड, शशिकांत तिडके, भागवत मस्के, गणीभाई पठाण, नारायण पवार, गजानन गोपकर आदींचा समावेश आहे.


थोडे नवीन जरा जुने