पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. शहराध्यक्ष व मा.महापौर श्री. योगेश मंगलसेन बहल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मा.महापौर योगेश बहल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "भारत हा शेतीप्रधान आणि सर्वांत मोठा लोकशाही देश असून, अनेक धर्म, जाती, भाषा आणि संस्कृती यांचे एकत्रित दर्शन भारतात घडते. देशाच्या विकासात आपले योगदान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्याला देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना सदैव स्मरावे लागेल."
कार्यक्रमास माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शहर कार्याध्यक्ष फजल शेख, ॲड. गोरक्ष लोखंडे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, मा.उपमहापौर मोहंम्मद पानसरे, माजीनगरसेवक दत्तोबा लांडगे, गोरक्षनाथ पाषाणकर, माजी सभापती विजय लोखंडे, मायला खत्री, विनायक रणसुभे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंह वालिया, सेवादल अध्यक्ष महेश झपके, खजिनदार दीपक साकोरे, ओबीसी अध्यक्ष प्रशांत महाजन, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी, अर्बन सेल अध्यक्षा मनीषा गटकळ, असंघटित कामगार सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने पार पडले.