PCMC : "खड्डेमुक्त शहरासाठी काँग्रेसचे वृक्षारोपण आंदोलन"


पिंपरी चिंचवड :(क्रांतीकुमार कडुलकर) - पावसामुळे शहरातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडले असून नागरिकांचे हाल होत आहेत. गणेशोत्सवाच्या गर्दीत या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. महापालिका प्रशासन मात्र निष्क्रिय आहे, असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष डॅा.कैलास कदम यांनी केला आहे.

या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे काल शुक्रवार, दि.  ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता विशेष आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये प्रतीकात्मक वृक्षारोपण करून महापालिकेविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

आंदोलनाचे मार्गक्रमण मुंजोबा चौक वाल्हेकर वाडी येथून सुरू होऊन चिंचवड, काळेवाडी, सांगवी, वाकड, डांगे चौक, रावेत, देहूरोड, प्राधिकरण, आकुर्डी, पिंपरी, भोसरी, मोशी, चिखली, निगडी आदी प्रमुख भागातून होत थरमॅक्स चौक येथे समारोप करण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले, "खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. सणासुदीच्या काळात हे अधिक धोकादायक ठरू शकते. महापालिकेच्या निष्काळजीपणाविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार असून नागरिकांच्या हक्कासाठी लढा देत राहणार आहे."

या आंदोलनात ज्येष्ठ नेते अशोक मोरे, मयूर जयस्वाल, बाबासाहेब बनसोडे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, अबूबकर लांडगे, चंद्रकांत लोंढे, अर्चना राऊत, अरुणा वानखेडे, मिलिंद फडतरे, भास्कर नारखेडे, सतीश भोसले, दहार मुजावर, मझर खान, पीर मोहम्मद पठाण, वसंत वावरे, अमरजीत सिंग पाथीवाल, दीपक भंडारी, जितेंद्र छाबडा,  याकुब शेख, रामा शिंदे आदींसह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

थोडे नवीन जरा जुने