पिंपरी चिंचवड - आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याच्या महिला उपाध्यक्षा तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्षा मीनाताई जावळे यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी ७ वाजता दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या निधनाने आप पिंपरी चिंचवड शहर तसेच महाराष्ट्र राज्यातील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक मार्गदर्शक व समाजसेविका गमावल्या आहेत.
मीनाताई जावळे यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजसेवे मध्ये व्यतीत केले होते. त्या नेहमी अनेक सामाजिक उपक्रम घेत होते. त्या नेहमी जनतेच्या सुख दुःख घेऊन जात होत्या. मीनाताई जावळे यांच्या आकस्मित निधनाने आप पिंपरी चिंचवडला खूप मोठा धक्का बसला आहे अशी भावना उपाध्यक्ष यशवंत कांबळे यांनी व्यक्त केली.
सर्व पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी तर्फे मीनाताई जावळे यांना विनम्र व भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.