PCMC : “निगडी भक्ती-शक्ती चौकात दहीहंडीचा जल्लोष; चेंबूरच्या ‘क्रेझी इगल’ पथकाने मारली ७ थरांत विजयी झेप!”

 


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) व युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी उत्सव निगडी भक्ती-शक्ती चौक येथे मोठ्या जल्लोषात पार पडला. मुंबई, ठाणे, चाकण, चेंबुर या ठिकाणांहून तब्बल १२ गोविंदा पथकांनी सलामी देत उपस्थिती लावली. या सोहळ्यात चेंबूरच्या ‘क्रेझी इगल गोविंदा’ पथकाने तब्बल सात थर रचून दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला.





  या सोहळ्यास खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अमित गोरखे, माथाडी कामगार अध्यक्ष इराफान सय्यद, अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष हाजी आराफत शेख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक राहुलदादा कलाटे, मोरेश्वरभाऊ भोंडवे, सिद्धार्थ बनसोडे, कामगार सेना अध्यक्ष काशिनाथ नखाते, आरपीआय गटाध्यक्ष बाळासाहेब भागवत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिग्दर्शक शाम मोहिते, बाळासाहेब कड व अभिनेत्री राधा सागर यांनीही उपस्थित राहून सर्व गोविंद व बाळ-गोपाळांचे अभिनंदन केले. या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन मनसे अध्यक्ष सचिन चिखले व युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी केले होते.

 स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. याबद्दल नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका अश्विनी सचिन चिखले- मराठे, प्रतिक शिंदे व रोहित काळभोर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

सचिन चिखले - मनसे शहराध्यक्ष

थोडे नवीन जरा जुने