पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - लहुजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्यच्या वतीने मिलिंद नगर, पिंपरी येथे स्वातंत्र्य दिन तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात अंगणवाडीतल्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटण्यात आला तसेच झेंडावंदनाचा सोहळा पार पडला.
कार्यक्रमात विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले :
समाज मित्र पुरस्कार : मा. नगरसेवक संदीप वाघेरे
समाजरत्न पुरस्कार : विधान परिषदेचे आमदार व तालिका सभापती मा. अमित गोरखे
समाजभूषण पुरस्कार : ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे व सामाजिक कार्यकर्ते सुरेश जोगदंड
याशिवाय प्रफुल्ल पुराणिक (जनसंपर्क अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका), अनिता गणेश वाळुंजकर (मंडळ अध्यक्ष, पिंपरी-दापोडी) व भगवान शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला भाजपा अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोडमल, प्रा. धनंजय भिसे, महोत्सव समिती अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, भाजपा नेते गणेश वाळुंजकर, लहूयोद्धा युवराज दाखले, नशीमुद्दीन अन्सारी, महोत्सव समिती सचिव विशाल कसबे, समाजभूषण पुरस्कार विजेते मारुती सोनटक्के, आदर्श पत्रकार वंदना जाधव, पत्रकार माणिक पोळ, भरत इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, स्थानिक नागरिक आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या शिक्षिका व सेविका हेदेखील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन लहुजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सतिश भवाळ, विकास भवाळ, बापू जगधने, लक्ष्मण भवाळ, बबन क्षीरसागर व विजय भवाळ यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू गोरखे यांनी तर आभार प्रदर्शन विकास भवाळ यांनी केले.