PCMC : 15 ऑगस्ट रोजी लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार्स – समाजसेवेचे चार उपक्रमाचे आयोजन

 


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) -  स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र प्रसंगी लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार्स तर्फे समाजसेवेच्या तीन विशेष उपक्रमांचे आयोजन लायन प्रीती बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. हा दिवस केवळ झेंडा फडकवण्याचा नाही, तर समाजासाठी कृती करण्याचा म्हणूनही स्मरणीय ठरला.

१) वृक्षारोपण कार्यक्रम

लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार्स आणि पिंपरी चिंचवड ऑर्थोपेडिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जंगल गार्डन येथे वृक्षारोपण केले गेले, ज्यामुळे पर्यावरणाला नवा श्वास मिळाला.

प्रेसिडेंट लायन विद्या वकारे यांनी जागा निवड केली, जेणेकरून वृक्ष योग्य ठिकाणी लावता यावे.

२) ब्लाइंड स्कूल सेवा उपक्रम

ध्वजारोहणानंतर, लायन राजेश्री चितलांगे मॅडम यांनी आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी ५ सीलिंग फॅन्स स्पॉन्सर केले, तसेच क्लब तर्फे फळांचे वाटप केले गेले.

डॉ. लायन प्रज्ञा देवकाते यांनी सर्व मुलांसाठी बिस्किट्सचे आयोजन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि दैनंदिन जीवनात सुविधा व आनंद वाढविला गेला.

३)  हेल्थ चेकअप व दंतचिकित्सा शिबिर

गुंजकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. देवकाते डेंटल क्लिनिक व डायट तज्ञ डॉ. प्रेरणा गोपाळे यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे ३०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.



५) मेघा ब्लड डोनेशन कॅम्प

 उपस्थित डॉक्टर्स व मान्यवर

लायन्स क्लब तर्फे Zone Chairperson: लायन मुकुंद आवटे, लायन मुरलीधर साठे, डॉ. लायन भाग्यश्री गुंजकर, डॉ. लायन स्वाती देवरे, डॉ. शितल नांदेडकर, डायट तज्ञ: डॉ. प्रेरणा गोपाळे, लायन भक्ती बोराटे, लायन रविराज साबळे, लायन सुनील भोयर, लायन नवनाथ वाघचौरे, लायन वैशाली वाघचौरे, लायन जितेश वकारे, लायन जयंत बोंडे हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पिंपरी चिंचवड ऑर्थोपेडिक असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. विष्णू नांदेडकर – चेअरमन, डॉ. शिरीष झोपे – मेम्बर, डॉ. मयूर पुरंदरे – मेम्बर, डॉ. शाम शिंदे – अध्यक्ष, PCOA, डॉ. संजय साळवे – सचिव, PCOA, डॉ. दिनेश पाटील – PCOAव त्यांची सर्व टीम यांनी सहकार्य केले.

क्लब पदाधिकारी President: लायन विद्या वकारे, Secretary: डॉ. लायन शितल मोरे, लायन सर्जीने सर Treasurer: डॉ. लायन प्रज्ञा देवकाते, PRO: लायन जयंत बोंडे, क्लब अॅडमिनिस्ट्रेटर आणि संस्थापक लायन प्रीती बोंडे (DC Women Empowerment) यांनी या चारही उपक्रमाचे संयोजन केले.

थोडे नवीन जरा जुने