PCMC : अरुण पवार यांचा वाढदिवस ग्रंथदान, वृक्षदान, शालेय साहित्य वाटप करीत उत्साहात साजरा

 


ह.भ.प. निवृत्ती महाराज कदम धाराशिवकर यांनी प्रवचनातून दिला आशीर्वाद 

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

आळंदीचे माऊली महाराज (मोठे) कदम यांचे वडील ह.भ.प. निवृत्ती महाराज कदम धाराशिवकर यांनी अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवचन सेवा देत वाढदिवस अभिष्टचिंतन केले. 

 वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त ग्रंथदान स्वरूपात ७५० ज्ञानेश्वरी ग्रंथ, ९२५ तुकाराम गाथा ग्रंथ, १२५ संविधान प्रत, ५७०० वृक्षांची रोपे, ४०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.




 तसेच नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ अभिनेत्री साक्षी चौधरी व गुरुवर्य माऊली योग सेंटरच्या योगशिक्षिका मीनाक्षी खैरनार यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये मतदान कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड यांचे स्मार्ट कार्ड मोफत करून देण्यात आली. सुदर्शन नगर पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी, जाधववाडी, चिखली घरकुल आदी ठिकाणच्या ४७०० नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्डचा लाभ घेतला. 

ह.भ.प. निवृत्ती महाराज कदम धाराशिवकर म्हणाले, की अरुण पवार यांनी प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द, कष्टाच्या जोरावर प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांचे हे यश प्रेरणादायी आहे. भावी आयुष्यातही ते मोठी झेप घेतील, असा विश्वास आहे. कारण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा कृपाशिर्वाद त्यांना आहे. हजारो झाडांना दिलेले जीवनदान दिले आहे. या वृक्षांचे आशीर्वादही त्यांना समाजसेवा करण्यास बळ देत आहेत. ते कोणत्याही क्षेत्रात गेले तरी अंतःकारणातला माऊली विसरला जाणार नाही, याची खात्री आहे. 

ह.भ.प. मारुती माऊली कोकाटे सुतारवाडी यांनी अरुण पवार यांच्या व्यावसायिक यशात कुटुंबाची साथही महत्वाची असल्याचे सांगत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या पाठीशी फक्त लोकच नाहीत, तर वृक्षांचा आशीर्वाद आहे, ही मोठी गोष्ट आहे. तो आशीर्वादच त्यांना सर्वकाही देऊन जात आहे. 

  दरम्यान, अभिष्टचिंतन निमित्त धाराशिव येथील संत तुकाराम महाराज भजनी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, विश्वगुरू भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी ह.भ. प. मारुती माऊली कोकाटे, ह. भ.प. बब्रुवान वाघ महाराज, ह.भ.प.बाबुराव तांदळे महाराज, समाज प्रबोधनकार शारदा मुंढे, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, ह.भ.प. धारु मामा बालवडकर, भंडारा डोंगर मंदिर संस्थान समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद पाटील, ह.भ.प. जगन्नाथ नाटक पाटील, सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक कारागृह विठ्ठलराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते राहुल कलाटे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, लोकनियुक्त सरपंच बालाजी पवार, पिंपळे गुरव भैरवनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप पाटील, इम्रान शेख, माजी नगरसेवक अतुल शितोळे, तानाजी जवळकर, शाम जगताप, माजी स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, शिवाजी पाडुळे, अमरसिंग आदियाल,  उद्योजक बाळासाहेब काकडे, बाबुराव शितोळे, प्रकाश इंगोले, कॅप्टन युवराज माने, अभिमन्यु पवार, धनाजी येळकर, अनिताताई पांचाळ, गणेश पाडुळे, कॅप्टन बालाजी पांचाळ, विमलताई घोडे, संदीप राठोड, प्रा. विष्णू शेळके, अभिमन्यु पवार, अभिमन्यू गाडेकर, ॲड. अतुल पाटील, ॲड. मनोज मोरे, सुर्यकांत कुरुलकर, देवेंद्र तायडे, वामन भरगंडे, प्रवीण कदम, दत्तात्रय धोंगडे, युवराज माने, बळीराम माळी, नामदेव पवार, शशिकांत दुधारे, पुनाजी रोकडे, सखाराम वालकोळी, बाळासाहेब साळुंखे, शंकर तांबे, कॅप्टन राजेंद्र कांबळे, ह.भ.प. अशोक ढोरे पाटील, ह.भ.प. सूर्यकांत ढोरे ह.भ.प. बाळासाहेब शितोळे, ह.भ.प. रमेश ढोरे, सौरभ शिंदे, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ, हास्य योग परिवार सुदर्शन नगर, हास्य योग परिवार पिंपळे गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन सोमनाथ नाडे यांनी, तर आभार वामन भरगंडे यांनी मानले.

            

थोडे नवीन जरा जुने