PCMC : सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ने केला स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान


पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ तर्फे समाजातील चांगले काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यात आला, त्यापैकी एक म्हणजे श्री त्रिंबक बांगर.

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सफाई विभागात गेली ३० वर्षे अविरत सेवा देत असणारे असामान्य व्यक्तिमत्व, जिद्द, चिकाटी आणि कामाबद्दल असले प्रेम हे त्यांचे कर्तृत्व आहे, त्यांच्या या निस्वार्थ सेवेला सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ तर्फे सन्मान करताना सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात व अमित कोकणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर, पुणे शहर जनरल सेक्रेटरी रवींद्र आळणे व सदस्य श्रीकांत शेळके यांनी सन्मान केला.

अजून एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. अभिनंदन जाधव, थेरगाव कोरोना काळात खुप लोकांची काळजी घेतली तसेच समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेने महिन्यातून दोन दिवस लोकांना मोफत सेवा ते देत असतात हा उपक्रम ६ वर्षांपासून चालू आहे. थेरगाव मधील माजी नगरसेवक तानाजी भाऊ बारणे यांच्या हस्ते सर्टिफिकेट देऊन डॉ अभिनंदन जाधव यांचा सन्मान करण्यात आला. 

त्या प्रसंगी संस्थेच्या सदस्य राजश्री रावडे. सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ च्या सदस्य राजश्री रावडे यांच्या पुढाकारातून हा सन्मान करण्यात आला.


कर्तृत्ववान व्यक्तींचे सन्मान करून त्यांना या सन्मानातून प्रेरणा मिळून ते देशासाठी अजून जोमाने काम करतील आशा भावनेतून सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी कुंभारे यांनी या सन्मानाची सुरुवात केली. तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी आशा प्रकारचे सन्मान करण्यात आले.

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ही संस्था देश पातळीवर मानव अधिकार साठी काम करत असताना समाजात एक अनोखी बांधिलकी जपत असणाऱ्या कर्तव्यदक्ष नागरिकांचा सन्मान नेहमीच करत असते तर हे सन्मान केल्याबद्द्ल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी रवींद्र आळणे व राजश्री रावडे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सदर सन्मान हे समाजातील बदल घडविण्यासाठी फार महत्वाचे असतात व यातूनच देशाचा विकास होत असतो अशी प्रतिक्रिया सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी दिली.

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ही संस्था गेल्या सहा वर्षांपासून सामाजिक जाणिवेतून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना संस्थेच्या विस्तारासाठी १५ ऑगस्ट रोजी मोफत सदस्य नोंदणी मोहीम सुद्धा राबविली होती तर तिला उत्तम प्रतिसाद मिळाला असून गरजू लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

संस्थेच्या बरोबर जोडून काम करण्यासाठी आपण पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात 8796824682 यांनी संपर्क करू शकता.

थोडे नवीन जरा जुने