पिंपरी चिंचवड - कष्टकरी कामगारांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का ? आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना कष्टकरी कामगारांना कामाला लावणे त्यांच्याकडून काम करून घेणे अत्यंत चुकीचे होते.
बीएसएनएलच्या ऑप्टिक फायबरचे काम असल्याचे समजते मात्र कष्टकरी कामगारांच्या व्यथा आणि कथा मांडणारे अण्णाभाऊ साठे यांनी म्हटले होते की या आजादी झुटी हे देश की जनता भुकी है त्याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली कष्टकरी कामगारांना सुरक्षाची साधने न दिल्याने त्यांची काळजी न घेतल्याने जिवाला मुकले आहेत.
वास्तविक अशा कामाचे वेळी सोबत डॉक्टर आणि काळजी घेणारी स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे असताना अशाप्रकारे निगडी प्राधिकरण येथे चुकीच्या पद्धतीने काम करायला लावल्याने तीन निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला .
असे धोकादायक कामाला लावण हे चुकीचे याला जबाबदार असणाऱ्या बीएसएनएल अधिकारी कर्मचारी महानगरपालिका तसेच ठेकेदार या संबंधित सर्व दोषीवर मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी तसेच आहे मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये अर्थसाह्य द्यावे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी शासन प्रशासनाने प्रयत्न करावे अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी कालच आळंदी येथे उपस्थित असणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री यांचेकडे केले आहे.