पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - “आजचा काळ हा प्रदूषण, हवामान बदल आणि वाढत्या शहरीकरणाचा आहे. अशा वेळी वृक्षारोपण हे केवळ सामाजिक कार्य नसून प्रत्येकाची जबाबदारी आहे,” या संदेशासह पिंपरी चिंचवड ऑर्थोपेडिक असोसिएशन (PCOA) आणि लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथे 15 ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी 7.00 वाजता वृक्षारोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
PCNDTA सर्कल, सेक्टर नं. ३, इंद्रायणी नगर येथे झालेल्या या उपक्रमात निसर्गासाठी एक पाऊल टाकण्याचा संकल्प सर्वांनी केला.
या वेळी PCOA सोशल कमिटीचे चेअरमन डॉ. विष्णू नांदेडकर, डॉ. शिरीष जोपे, डॉ. मयूर पुरंदरे, डॉ. दिनेश पाटील, , तसेच अध्यक्ष डॉ. शाम शिंदे व सचिव डॉ. संजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय PCOA च्या टीममधील १५ ते २० डॉक्टर्सही उपस्थित होते व त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टारकडून क्लब प्रशासक लायन प्रीती बोंडे, अध्यक्षा लायन विद्या वकारे, सचिव डॉ. शितल मोरे, खजिनदार डॉ. प्रज्ञा देवकाते तसेच अनेक लायन्स सभासद उपस्थित होते.
यावेळी डॉ. लायन स्वाती देवरे, लायन जयंत बोंडे, लायन जितेश वकारे, डॉक्टर शितल नांदेडकर, लायन सर्जीने, लायन सुनील भोयर, लायन नवनाथ वाकचौरे, लायन वैशाली वाकचौरे, लायन रविराज साबळे आणि लायन भक्ती बोराटे यांनीही वृक्षारोपणात विशेष योगदान दिले.
या उपक्रमाद्वारे निसर्ग संवर्धनाचा संदेश देत, वृक्ष लागवडीद्वारे भविष्य पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.