पिंपरी चिंचवड - ब्रिटिश कालखंडात निर्माण केलेला 1871 चा क्रिमिनल ट्राईब ऍक्ट हा मातंग, पारधी, कैकाडी, भटक्या, वंचित समाजाचा सर्वांगीण विकासाचा कणा मोडणार होता. त्यांच्यावर या कायद्याने निर्बंध लादले गेले आणि त्यांना कायद्याने गुलाम केले. त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली. त्यांमुळे या जातींचा सर्वांगीण विकास रोखला तो आज ही भरुन येताना दिसत नाही. या गुन्हेगार जातीतील बहुतांश जातींना आरक्षण असताना देखील त्यांचा विकास आज ही होऊ शकला नाही. त्यांमुळे शासनाने यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योजना विकासासाठी विशेष तरतुद करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक/अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिका व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘1871 चा गुन्हेगारी जाती जमातीचा कायदा आणि त्याचे मातंग समाजावर होणारे परिणाम ‘ या विषयावरील परिसंवादाच्या निमित्ताने त्यांनी मत प्रकट केले.
यावेळी विजय बोडके यांनी ‘मांग गारुडी समाजाचं नुकसान गुन्हेगारी कायद्यामुळे झाले आहे.आणि ते आज ही होत आहे. मांग गारुडी समाज आजही विकासापासून वंचित आहे अशी खंत त्यांनी मांडली. ’तर प्रा प्रदीप मोहिते यांनी ‘ हिंदू धर्मात वर्णाश्रम पद्धत होती. मुळा सूत्रांना त्यामुळे शुद्रांना कोणतेच अधिकार नव्हते. या जात जमाती गुन्हेगार आहेत अशी माहिती इंग्रजांना देणारे कोण होते?
असा प्रश्न उपस्थित केला तर अध्यक्ष भाषणामध्ये संदिपान झोंबाडे यांनी अतिशय परखड मत मांडले. कायद्याने गुन्हेगार जात म्हणून भरडले गेलेल्या जाती-जमातींना शासनाने विशेष सवलत किंवा विशेष योजना निर्माण करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणं गरजेचं असून आज जर हे काम झालं नाही तर येणाऱ्या काळात अनेक सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात. असे अध्यक्ष भाषणात परखड मत मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज दाखले यांनी केले. सूत्रसंचालन विशाल कसबे,आभार सतीश भवाळ यांनी मांडले.
महोत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, गणेश अवघडे भाऊसाहेब आडागळे, नाना कसबे, अरुण जोगदंड संजय ससाने भगवान शिंदे, केशर लांडगे, सुनील भिसे,अण्णा कसबे, शिवाजी साळवे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.