PCMC : नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग कौशल्याने करा - आर्किटेक्ट मनीष बॅंकर

 


एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲन्ड डिझाईन येथे वास्तू रचनेच्या संकल्पनेवर मार्गदर्शन 

पिंपरी चिंचवड  (क्रांतीकुमार कडुलकर) -  वास्तू रचनाकाराने नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग वास्तू उभारताना कौशल्याने केला पाहिजे. वास्तू उभारताना उपलब्ध जमीन तेथील पाण्याचे स्त्रोत, विविध प्रकारची झाडे झुडपे, पशु पक्षी यांचा अधिवास धोक्यात येणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. निसर्ग आणि पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होईल याचा विचार करून नैसर्गिक साधनसंपत्ती आणि आधुनिक वास्तू उभी केली पाहिजे, असा कानमंत्र ताओ आर्किटेक्चर चे संचालक मनीष बँकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

 पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲन्ड डिझाइन येथे प्रसिद्ध आर्किटेक्ट मनीष बॅंकर यांनी वास्तू रचनेची संकल्पना आणि आर्किटेक्चर मधील नाविन्यपूर्ण  प्रयोग या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


यावेळी बँकर यांनी विविध प्रकल्पांची माहिती दृकश्राव्य माध्यमातून प्रकल्पाची उपलब्ध जागा, जमिनीच्या मातीचा पोत, परिसरातील हवामान, पर्जन्यमान, उष्णता, वाऱ्याची दिशा, पाण्याची उपलब्धता त्यानुसार घरांचे बांधकाम, नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत शंकांचे निरसन केले. 

सूत्रसंचालन तन्वी गणोरकर आणि जान्हवी भोसले हिने आभार मानले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


थोडे नवीन जरा जुने