पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - आज दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी भंडारा डोंगर, पायथा इंदौरी येथे लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर ऍक्टिव्ह तर्फे वृक्षारोपण उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमात अध्यक्ष लायन बालाजी जगताप, सचिव लायन डॉ. ज्योती क्षीरसागर, खजिनदार लायन जितेंद्र हिंगणे, MJF लायन सुनील जाधव, लायन संजय सोनार, लायन शोभा कदम, लायन अंजुम सय्यद, लायन धनंजय माने, लायन अरुण इंगळे, लायन जबिन पठाण, लायन प्रकाश कापरे व लायन कृष्णाजी तलिखेड़े यांसह अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होतेया उपक्रमात वड, पिंपळ, चिंच, अर्जुन, असे अनेक देशी झाडे लावण्यात आली.
हा उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठणार आहे, फक्त झाडे लावणार नसून या वृक्षांचे तीन वर्ष पालन पोषण पण करणार आहे असे प्रेसिडेंट लायन बालाजी जगताप यांनी सांगितले. असाच उपक्रम पूर्ण वर्ष चालू राहणार आहे प्रेसिडेंट लायन बालाजी जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
टीम – लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर ऍक्टिव्ह