PCMC : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ यांच्या जयंतीनिमित्त युवराज दाखले यांना लहूयोद्धा पुरस्काराने सन्मानित.

 


पिंपरी चिंचवड - साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे यांची १०५वी जयंती लहूजी ब्रिगेडच्या वतीने बोराडे वस्ती या ठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

या जयंती उत्सावात शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांना लहुजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सतिश भवाळ यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन लहुयोद्धा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. 

युवराज दाखले हे मातंग समाजाच्या चळवळीतील एक प्रमुख क्रियाशील कार्यकर्ते असून गेल्या अनेक वर्ष मातंग समाजाच्या उत्थानासाठी व विकासासाठी वेगवेगळ्या मार्गाने काम करत आलेले त्याचप्रमाणे असंघटित व्यापारी यांच्यासाठी शिवशाही व्यापारी संघटना स्थापन करून त्या माध्यमातूनही त्यांचं काम सुरू आहे.

 गेले अनेक वर्षापासून त्यांच्या या सामाजिक चळवळीचे दखल घेऊन लहुजी ब्रिगेड या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश मला यांनी त्यांना लहू योद्धा या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे, तरी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर युवराज दाखले यांनी आपल्याला मिळालेल्या पुरस्काराला उत्तर देत असताना आपल्या भाषणात म्हणाले की ,हा डॉ अण्णा भाऊ साठे ,लहुजी वस्ताद साळवे , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ,यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दिलेली प्रोसन पर शाबासकी आहे.



तरी हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तमाम कष्टकरी मातंग समाजातील चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे आणि हा पुरस्कार मी मातंग समाज तसेच बहुजन समाज चळवळीमध्ये काम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांच्या श्रमाला त्यांच्या कष्टाला त्यांच्या संघर्षाला अर्पण करीत आहे असं मत दाखले यांनी व्यक्त केले.

 यावेळी स्वत्नपूर्ती हौसिंग सोसायटीचे सभासद,शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लहुयोद्धा युवराज दाखले, लहुजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष सतिश भवाळ, उद्योजक मनोज माने, पत्रकार माणिक पौळ, व्याख्याते ज्ञानेश्वर बोराडे,वंदनाताई जाधव, प्रदिप कांबळे,बापु रसाळ, ज्ञानेश्वर साठे, गोपाळ डोईफोडे, छगन मुंडे, धनाजी शिंदे,विजय भवाळ,पुण्याबा माने, सुनिल साळवे, भगवान कांबळे, बजरंग गायकवाड, राजेश दिवटे, 

तसेच शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, उपाध्यक्ष अनिकेत साळवे, राहुल सावंत, गणेश वाघमारे, चौपडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने