PCMC : आकुर्डीत “स्वरश्रृंखला” भजन महोत्सवात श्रावणाचे भक्तिमय सूर गाजले!श्रद्धा, सूर आणि संस्कृतीचा भक्तिमय संगम!

 


श्रावण मासात भक्तिरसाने नटलेला “स्वरश्रृंखला” भजन महोत्सव!

“स्वरश्रृंखला” मध्ये नामस्मरण, गवळणी आणि भक्तीचा सुरेल संगम!

पिंपरी चिंचवड - श्रावण मासाच्या पवित्र पार्श्वभूमीवर सुवर्ण संगीत महिला भजनी मंडळ, आकुर्डी आणि चेतन संगीता गौतम बेंद्रे यांच्या वतीने आयोजित “स्वरश्रृंखला” हा भजन सेवा कार्यक्रम दिनांक २ ऑगस्ट २०२५, शनिवार रोजी सकाळी ११ वाजता भाजप जनसंपर्क कार्यालय, मयूर समृद्धी, आकुर्डी येथे भक्तिमय वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन ह. भ. प. किसन महाराज चौधरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विजय आण्णा जगताप, अध्यक्ष, महाराष्ट्र वाकरी महामंडळ, पिंपरी चिंचवड, ह. भ. प. श्री. जयंत उर्फ अण्णा बागूल, माजी नगरसेवक, पिं.चिं. मनपा,  विठ्ठल काळभोर, अध्यक्ष  खंडोबा देवस्थान ट्रस्ट, दत्ताभाऊ भगवान चिचवडे, संस्थापक अध्यक्ष भोलेश्वर कीर्तन महोत्सव, चिंचवडेनगर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन ह. भ. प. शिवाजी महाराज गावडे यांनी उत्तमरित्या पार पाडले.

या भजन सेवा कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड परिसरातील एकूण २१ भजनी मंडळांनी सहभाग घेतला. प्रत्येक मंडळाने एक भक्तिपूर्ण अभंग आणि एक गवळण सादर केली. पारंपरिक वेशभूषा, भावपूर्ण सादरीकरण आणि नामस्मरण यामुळे संपूर्ण सभागृह भक्तिरसात रंगून गेले.



भजन व गवळणींच्या सादरीकरणाचे परीक्षण करण्यासाठी ह.भ.प. ज्ञानदेव माऊली विटकर, ह.भ.प. सोपान महाराज कुरकुटे उपस्थित होते.

सुवर्ण संगीत महिला भजनी मंडळ, आकुर्डी यांच्या वतीने 

सुवर्णा संजय कुदळे,संगीता अंकुश काळभोर, संगीता गौतम बेंद्रे, कल्पना रोहिदास काळभोर, रंजना बाळासाहेब काळभोर, सुनिता लक्ष्मण तिरखुंडे, लिलावती महादेव काळभोर, अरुणा मधुकर दिसले, सुनंदा गुरव, छाया नंदू कुटे, सुशिला काठवटे संपूर्ण नियोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.

कार्यक्रमाचे आयोजक चेतन संगीता गौतम बेंद्रे यांनी प्रमुख पाहुणे, परीक्षक, सहभागी मंडळे, आयोजन समिती व सर्व उपस्थित भाविकांचे मनःपूर्वक आभार मानले.

त्यांनी नमूद केले की, सर्वांचे सहकार्य आणि भक्तिभावामुळे 'स्वरश्रृंखला' हा कार्यक्रम केवळ सादरीकरण नव्हे, तर एक भक्तिपर्व ठरले.

थोडे नवीन जरा जुने