इस्रायलमध्ये गाझा युद्ध संपवण्यासाठी आंदोलन, नेतान्याहू सरकारविरोधात नागरिक रस्त्यावर

Protests in Israel to end Gaza war, citizens take to the streets against Netanyahu government

जेरुसलेम : गाझा युद्ध संपविण्याची आणि हमासच्या ताब्यातील बंदिवानांची सुटका करण्याची मागणी करत इस्रायलमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. देशव्यापी आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी रस्ते अडवून वाहतूक ठप्प केली आणि त्वरित हमासशी करार करण्याची मागणी केली.

पोलीसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला आणि सुमारे 38 जणांना ताब्यात घेतले. बंदिवानांच्या कुटुंबांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन गटांनी रविवारी एक दिवसाचा देशव्यापी आंदोलनाचा कार्यक्रम आखला होता.


20 बंदिवान जिवंत असण्याची शक्यता 


आंदोलनकर्त्यांना भीती आहे की इस्रायलच्या वाढत्या हल्ल्यांमुळे बंदिवानांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यांना अजूनही हमासच्या ताब्यातील काही लोक जिवंत असल्याची आशा आहे. इस्रायल प्रशासनाचे म्हणणे आहे की सुमारे 20 बंदिवान हमासच्या कैदेत जिवंत आहेत. आंदोलनादरम्यान लोकांनी बंदिवानांचे फोटो हातात धरले होते. याबाबतचे वृत्त असोसिएटेड प्रेस (AP) ने दिले आहे.


नेतान्याहूंचा इशारा 


या आंदोलनाला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, हमासला पराभूत न करता युद्ध थांबवण्याची मागणी करणारे हे समजत नाहीत की त्यामुळे हमास आणखी मजबूत होईल. त्यानंतर बंदिवानांची सुटका अधिक कठीण होईल आणि देशाची सुरक्षा धोक्यात येईल.


Protests-in-Israel-end-Gaza-war-citizens-take-to-the-streets-against-Netanyahu-government
थोडे नवीन जरा जुने