पिंपरी चिंचवड : मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी अभिराज फाउंडेशन या दिव्यांग मुलांच्या शाळेमध्ये वूई टुगेदरचे अध्यक्ष श्री मधुकर बच्चे यांच्या हस्ते श्री ची आरती संपन्न झाली यावेळी वूई टुगेदरचे सलीम सय्यद, रवींद्र सांगडे (सल्लागार ) आदर्श शिक्षिका मंगला डोळे- सपकाळे, सर्व दिव्यांग विद्यार्थी व कर्मचारी वर्ग हे उपस्थित होते.
यावेळी अभिराज फाउंडेशनचे डायरेक्टर रमेश मुसुडगे व विद्यार्थ्यांच्या हस्ते मधुकर बच्चे यांची पिंपरी चिंचवड भाजपा सरचिटणीस परी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.