पिंपरी चिंचवड : सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, पुणे यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार मनीषा झावरे मॅडम यांनी आपले पैसे परत मिळत नसल्याची तक्रार केली होती. सदर प्रकरणात आम्ही चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांची भेट घेऊन समस्या सांगितली.
साळुंखे यांनी ही जबाबदारी त्यांच्या कार्यकक्षेत येत नसतानाही, वैयक्तिक पातळीवर पुढाकार घेत, समोरच्या व्यक्तीशी थेट संवाद साधून सुमारे दोन लाख साठ हजार रुपये मनीषा झावरे मॅडम यांना परत मिळवून दिले. ही अत्यंत प्रशंसनीय बाब असून, त्यांच्या या कार्याबद्दल सौ. मनीषा झावरे मॅडम यांच्या वतीने त्यांचा छोटासा सन्मान करण्यात आला.
तसेच, या कार्यात मोलाचे सहकार्य केलेल्या सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात, पुणे जिल्हा सचिव विजय महाजन, पिंपरी-चिंचवड शहर सचिव विनायक जगताप, तसेच पुणे शहर जनरल सेक्रेटरी रविंद्र आळणे उपस्थित होते.
वरील प्रकरणात किशोर थोरात सरांचे विशेष सहकार्य लाभल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.