बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी : हैदराबाद गॅझेटमुळे आंदोलन तीव्र


Banjara Community ST Category : महाराष्ट्रातील बंजारा समाजाने अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याची मागणी पुन्हा एकदा तीव्र केली आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, बंजारा समाजानेही याच गॅझेटचा आधार घेत आपली मागणी लावून धरली आहे. बंजारा समाज सध्या महाराष्ट्रात विमुक्त जाती आणि भटक्या जमाती (व्हीजेएनटी-ए) प्रवर्गात आहे, ज्याला 3% आरक्षण आहे. 

‘हैद्राबाद गॅझेटीयर’वरून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘हैद्राबाद गॅझेटीयर’च्या आधारावर बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची समाजाची मागणी सुरु झाली आहे. जर ‘हैद्राबाद गॅझेटीयर’च्या आधारावर मराठा समाजाला ‘कुणबी प्रमाणपत्र’ मिळत असेल तर त्याच गॅझेटीयरमध्ये ‘आदिवासी’ उल्लेख असलेल्या बंजारा समाजावर अन्याय का?, असा प्रश्न बंजारा समाजाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

बंजारा समाजाकडून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत सुरू असून बीड येथील बैठकीत समाजाने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय, मुंबईत 9 सप्टेंबर 2025 रोजी बंजारा समाजाची उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे, ज्यामध्ये पुढील रणनीती ठरवली जाईल. 

सरकारसमोरील आव्हाने

हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता. यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, या निर्णयाला ओबीसी समाजाने तीव्र विरोध केला असून, नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. आता बंजारा समाजाच्या मागणीमुळे सरकारची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Banjara community demands inclusion-in-ST-category-Protest-intensifies-due-Hyderabad-Gazette

थोडे नवीन जरा जुने