सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात एक मोठा वाद उसळला आहे. माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्याच्या कामासाठी अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारीनंतर डीएसपी अंजली कृष्णा त्या ठिकाणी कारवाईसाठी पोहोचल्या. मात्र, त्यावेळी गावकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला.
या वादादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला आणि तो फोन डीएसपी अंजली कृष्णा यांच्याकडे दिला.
डीएसपी अंजली कृष्णा यांनी अजित पवार यांना ओळखण्यास नकार दिला
फोनवर अजित पवार यांनी स्वत:ची ओळख "डीसीएम अजित पवार" अशी करून कारवाई थांबवण्याचा आदेश दिला. मात्र, अधिकारी अंजली कृष्णा यांनी त्यांना ओळखण्यास नकार दिला आणि सांगितले की, तुम्ही थेट माझ्या मोबाईलवर कॉल करा. यामुळे अजित पवार चिडले आणि म्हणाले, "तुझ्यावर कारवाई करीन, एवढी हिम्मत? माझं चेहरा तरी ओळखशील ना!" त्यानंतर अजित पवार यांनी थेट व्हिडिओ कॉल केला.
व्हिडिओ कॉल दरम्यान अजित पवार यांनी अधिकारी अंजली कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचा आणि तहसीलदाराशी संपर्क साधण्याचा निर्देश दिला. हा संपूर्ण प्रकार जवळपास ३ तास चालला. यावेळी झालेली चर्चा आणि वादविवादाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही.
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 2, 2025
त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ काॅलच केला.#ajitpawar #AnjaliKrishna pic.twitter.com/ag2DNuf3do
कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन करून उभारला गोंधळ
गावकऱ्यांनी सांगितले की उत्खनन ग्रामपंचायतीच्या परवानगीने सुरू आहे, परंतु त्याचे कोणतेही अधिकृत कागदपत्र सादर करण्यात आले नाही. त्यामुळे डीएसपी अंजली कृष्णा यांनी कारवाई सुरू ठेवली. असं सांगितलं जातंय की, स्थानिक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करूनच हा वाद अधिक वाढवला.
सध्या या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार पोलिसांत दाखल झालेली नाही. डीएसपी अंजली कृष्णा, तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याकडून यावर कोणतंही अधिकृत विधान देण्यात आलेलं नाही, फक्त एवढंच सांगितलं गेलं आहे की, प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-slaps-female-IPS-officer-video-goes-viral