Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Recruitment 2026 : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत विविध पदांसाठी एकूण २२२ रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), उपअग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, चालक-यंत्रचालक, उद्यान सहाय्यक, अनुलेखक (ट्रेसर), अग्निशामक आणि रोखपाल अशा विविध पदांचा समावेश आहे.
पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून काही पदांसाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा, काहींसाठी पदवी आणि अनुभव, तर काही पदांसाठी १०वी/१२वी उत्तीर्ण, ITI, अग्निशमन प्रशिक्षण आणि संबंधित परवाने आवश्यक आहेत. रोखपाल पदासाठी B.Com आणि संगणकावर टंकलेखन कौशल्य आवश्यक आहे.
अर्जदार उमेदवारांचे वय ३१ जानेवारी २०२६ रोजी १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय, अनाथ आणि आ.दु.घ प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी ₹१००० परीक्षा फी तर मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांसाठी ₹९०० फी निश्चित करण्यात आली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर येथे केली जाणार असून परीक्षेबाबतची माहिती पुढे जाहीर करण्यात येईल.
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------------------------------------------
अधिकृत वेबसाईट - येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी - येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी - येथे क्लिक करा
------------------------------------------------------
.png)