MGID Header Code
Code End

स्वकुळ साळी ज्ञातीगृह वर्धापन दिनी साळी समाज इतिहास ग्रंथाचे प्रकाशन

 


आळंदीत विविध उपक्रमांचे आयोजन 

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील स्वकुळ साळी ज्ञातीगृहाचा 21 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी आळंदीत 21 एप्रिल 2026 रोजी साजरा होत आहे. या निमित्त स्वकुळ साळी समाजाचा इतिहास या ग्रंथांचे प्रकाशन हरिनाम गजरात होणार आहे.   

   या  वर्धापन दिन समारंभाचे विशेष अतिथी उपजिल्हा अधिकारी स्वरूपजी कंकाळ, उद्योजक हिरा ज्वेलर्सचे राजेश उगले आदी मान्यवर रहाणार आहेत. वर्धापन दिना निमित्त श्री. ज्ञानेश्वर माऊलींची पूजा, श्रींचे समाधी दर्शन व पूजा स्वरूपजी कंकाळ आणि भगवान श्री. जिव्हेश्वर महाराज पंचामृत महाअभिषेक पूजा राजेश उगले यांच्या हस्ते प्रथा परंपरांचे पालन करीत होईल. यावेळी साळी समाजाचे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.  

    महाराष्ट्रातील साळी समाजातील विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभास महाराष्ट्रातील मान्यवर नगरसेवक उपस्थित रहाणार आहेत. यात मुंबई येथील अश्विनी मते, महाड रायगड येथील रणजीत साळी, मुरुड जंजिरा  रायगड येथील 

नितीन अंबुर्ले, चिपळूण रत्नागिरी येथील वैशाली निमकर, इचलकरंजी कोल्हापूर येथील राजू बोंद्रे, कलावती गदगे, पैठण छत्रपती संभाजीनगर येथील रूपाली सोनारे, धारूर बीड येथील माधुरी लोकरे, अमळनेर जळगाव येथील दादासाहेब पवार, प्रतापशेठ साळी, अचलपूर अमरावती येथील सुशीला इंगळे, अंजनगाव  सुर्जी अमरावती येथील अविनाश ढेने आणि मनीष मेन यांचा समावेश असून सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी यांचा विशेष सत्कार केला जाणार असल्याची माहिती विश्वस्त विलास सरोदे यांनी दिली. 

   स्वकुळ साळी ज्ञाती गृहा मार्फत स्वकुळ साळी समाजाचा इतिहास या  ग्रंथांचा प्रकाशन सोहळा डॉ. लिली जोशी यांच्या शुभहस्ते होईल. 21 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सर्व साळी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वकुळ साळी ज्ञातीगृहाचे आळंदी येथील माजी अध्यक्ष लायन चंद्रकांत हावरे यांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने