तरूणांनासाठी खूशखबर : एसटी महामंडळात १७,४५० पदांसाठी मेगाभरती

Mega recruitment-for-17450-posts-in-ST-Corporation-MSRTC


मुंबई (MSRTC) : गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे तोट्यात असलेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आता कात टाकण्याच्या दिशेने मोठा पाऊल उचलत आहे. परिवहनमंत्री तथा एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शनिवारी जाहीर केले की, महामंडळ लवकरच १७ हजार ४५० पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मोठी भरती करणार आहे. 

एसटी महामंडळात (MSRTC)  मेगा भरती!

MSRTC गेल्या काही वर्षांत सतत तोटा सहन केला आहे. कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढल्याने सेवा प्रभावित झाली होती. आता, भविष्यात येणाऱ्या ८ हजार नव्या बससाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने ही मेगाभरती होत आहे. परिवहनमंत्री सरनाईक यांनी सांगितले की, "हे निर्णय MSRTC च्या अलीकडील बोर्ड बैठकीत घेण्यात आले. या भरतीमुळे महामंडळाची क्षमता दुप्पट होईल आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळेल." ही भरती सहा विभागीय कार्यालयांद्वारे ई-टेंडरींग प्रक्रियेद्वारे राबवली जाईल, ज्याची सुरुवात २ ऑक्टोबरपासून होणार आहे.

या भरतीमुळे केवळ नोकऱ्यांची संधीच निर्माण होणार नाही, तर महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. सध्या एमएसआरटीसीकडे १९१ डेपो आहेत आणि दररोज हजारो बस धावतात. नव्या बसमुळे मार्ग वाढतील आणि ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारेल. तसेच, कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊन सेवा अधिक कार्यक्षम होईल.

ही भरती प्रामुख्याने चालक आणि सहाय्यक पदांसाठी असून, ती कंत्राटी पद्धतीने तीन वर्षांसाठी केली जाईल. या निर्णयामुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी संधी मिळणार असून, महामंडळाच्या सेवेची गुणवत्ता वाढेल आणि प्रवाशांसाठी बससेवा अधिक सुरळीत होईल.

पदे, पात्रता आणि पगार संरचना

ही भरती प्रामुख्याने चालक आणि सहाय्यक पदांसाठी आहे. एकूण १७,४५० पदे भरली जाणार आहेत. वय मर्यादा - १८ ते ४० वर्षे (आरक्षणानुसार सवलत), निवड प्रक्रिया - लिखित चाचणी, ड्रायव्हिंग टेस्ट (चालकांसाठी), वैद्यकीय तपासणी आणि मुलाखत, अर्ज प्रक्रिया - msrtc.maharashtra.gov.in या  अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन करता येणार आहे.

Mega recruitment-for-17450-posts-in-ST-Corporation-MSRTC
थोडे नवीन जरा जुने