अंजना कृष्णा यांना अजित पवार यांच्याशी फोनवर जोडणाऱ्या कार्यकर्त्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

Offensive video of activist connecting Anjana Krishna with Ajit Pawar over phone goes viral

सोलापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते अजित पवार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथील डीएसपी आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अवैध खनन प्रकरणात कारवाई थांबवण्यासाठी कथितपणे धमकावले. या घटनेत अंजना कृष्णा यांना अजित पवार यांच्याशी बाबाराजे जगताप यांनी मोबाईलवरून जोडून दिले होते. आता जगताप यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला आहे.


सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्ता बांधकामासाठी लागणाऱ्या मुरम मातीच्या अवैध खननाविरोधात कारवाई करण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आणि तहसील प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली होती. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये यावेळी वादावादी झाली. याचवेळी, एनसीपीचे स्थानिक कार्यकर्ते आणि कर्माला तालुका प्रमुख बाबाराजे जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला आणि तो फोन अंजना कृष्णा यांना देऊन त्यांच्याशी बोलण्यास सांगितले होते.


आता अजित पवार यांना मोबाईलवरून जोडून देणारे बाबाराजे जगताप यांचा एक एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ मध्ये बाबाराजे जगताप नशा करताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे आता अजित पवार यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. अजित पवारांना फोन करणारे हे तेच तालुका प्रमुख बाबाराजे जगताप आहेत का? त्यांच्या हातात काय आहे? अशा लोकांसाठी अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना धमकावले?” असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.


या प्रकरणावर सध्या तरी अजित पवार यांच्या कडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र ते काय बोलतील ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Offensive video of activist connecting Anjana-Krishna-with-Ajit-Pawar-over-phone-goes-viral


थोडे नवीन जरा जुने