पिंपरी चिंचवड –पेठ क्रमांक १८, महात्मा फुले नगर येथील जिजामाता पार्क, मथुरा स्वीट जवळील परिसर गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे अस्वच्छ झाला आहे. या ठिकाणी नियमितपणे कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार महानगरपालिका आरोग्य विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप योग्य ती कार्यवाही झालेली नाही. परिणामी नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी गैरसोय होत आहे.
नागरिकांनी अशी मागणी केली आहे की –
१. सदर ठिकाणी तातडीने स्वच्छता करून योग्य व्यवस्था करावी.
२. भविष्यात पुन्हा कचरा साचू नये यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा.
३. आरोग्य विभागाने नियमित लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवावा.
या संदर्भात तक्रारदार श्री. शिवानंद चौगुले (मो. ९८५००९९९२१) यांनी महानगरपालिका प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
----- नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.