PCMC- पिंपळे सौदागर येथे देवी आई माता मंदिर व दत्त मंदिर विसर्जन घाटावर तब्बल ४००० गणेश मूर्तींचे संकलन...


नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे युथ फाऊंडेशनचा पुढाकार – पर्यावरणपूरक विसर्जनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - पिंपळे सौदागर परिसरात यंदा गणेश विसर्जनाचे पर्व उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. परिसरातील देवी आई माता मंदिर व दत्त मंदिर विसर्जन घाटांवर तब्बल ४००० गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. या संकलनामुळे परिसरात पर्यावरणपूरक विसर्जनाचे नवे उदाहरण घालून दिले गेले आहे.

 नगरसेवक व भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या युथ फाऊंडेशनच्या पुढाकाराने घाटांवर विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

-मूर्ती संकलनासाठी कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली होती, विसर्जनानंतर उरलेल्या फुलांचा व पूजेच्या साहित्याचा वेगळा निपटारा तसेच भाविकांना पर्यावरणपूरक मूर्ती बसविण्याचे आवाहन करून घाटांवर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, प्रकाशयोजना व स्वयंसेवकांची उपस्थिती  होती.

विसर्जन घाटावर दिवसभर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. "गणपती बाप्पा मोरया"च्या गजराने आणि ढोल-ताशांच्या निनादाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

या प्रसंगी भाजप नगरसेवक तथा शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापु) काटे यांनी या संकल्पनाबद्दल मनोगत व्यक्त करताना सांगितले  की, 

पिंपळे सौदागर व परिसरातील गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक विसर्जनासाठी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. तब्बल ४ हजार मूर्ती संकलन झाले, ही केवळ संख्या नाही तर नागरिकांची जबाबदार भूमिका आणि पर्यावरणाबद्दलची जाणीव दाखवते. आपल्या श्रद्धेइतकाच निसर्ग आणि पवित्र नद्या जपणेही आपले कर्तव्य आहे. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून आनंद आणि समाधान वाटते. पुढील वर्षी आणखी जास्त प्रमाणात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया. यामुळे पिंपळे सौदागर परिसरात सुरक्षित,शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक विसर्जनाचे आदर्श उदाहरण निर्माण झाले आहे.

स्वयंसेवकांनी भाविकांना मदत करत मूर्ती संकलन, वाहतूक व स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली.

 यावेळी पोलीस, महापालिका कर्मचारी एकत्रितपणे कार्यरत होती.

थोडे नवीन जरा जुने