PCMC : दुर्गा नगर परिसरात पे पार्किंगची मागणी तीव्र

 


पिंपरी चिंचवड –भोसरी-निगडी रस्त्यावरील दुर्गा नगर येथे अंबिका पेट्रोल पंपासमोरील मोकळ्या जागेत अनेक ट्रॅव्हल्स बसेस व मोठ्या ट्रक्सचे अनधिकृत पार्किंग होत असून त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि असुविधा निर्माण झाली आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले यांनी फ क्षेत्रीय कार्यालयाकडे लेखी तक्रार सादर केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, या ठिकाणी पे पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. यामुळे अवैध पार्किंगवर आळा बसेल, रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल तसेच महानगरपालिकेला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल.


चौगुले यांनी स्पष्ट केले की, भोसरी-निगडी रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनेक शोरूम्स व हॉटेल्स असून त्यांना स्वतंत्र पार्किंग सुविधा नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात वाहनधारक रस्त्यावरच पार्किंग करतात आणि वाहतूक कोंडी गंभीर स्वरूप धारण करते.

--- नागरिकांच्या सुविधेसाठी आणि स्वच्छतेच्या दृष्टीने तातडीने पे पार्किंग सुरू करून आवश्यक नागरी सुविधा उभाराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिवानंद चौगुले 

9850099921

थोडे नवीन जरा जुने