PCMC: अन्न पदार्थ विक्रेत्यांच्या प्रशिक्षणास फेरीवाल्यांचा प्रचंड प्रतिसाद


एफ.एस.एस. ए.आय ,एफ डी ए व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आयोजन

पिंपरी चिंचवड - भारतीय अन्नसुरक्षा मानके प्राधिकरण एफ एस एस ए आय, एफ डी ए आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने प्रा रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये आज पथारी, हातगाडी,टपरी धारकांना प्रशिक्षणाचे  आयोजन करण्यात आले त्यात तब्बल ७१७ विक्रेत्यांनी विक्रमी नोंद करून या प्रशिक्षणाचा लाभ घेतला उपस्थित विक्रेत्यांना एप्रॉन कॅप व अन्नपदार्थ बनवताना ची सुरक्षा साधने मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी  अन्न व औषध प्रशासनाच्या केंद्रीय संचालक ज्योती हरणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पथविक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर,किसन भोसले, अलका रोकडे, यांचेसह महासंघाचे संघटक अनिल बारवकर,कार्याध्यक्ष इरफान चौधरी, उपाध्यक्ष राजेश माने, बालाजी लोखंडे,सुनील भोसले, नंदू आहेर,  सूरज देशमाने,सचिन नागने,लाला राठोड, माधुरी जलमूलवार,रुक्मिणी जाधव,स्वाती पालके,लक्ष्मी गायकवाड,मुमताज शेख,जरीता वाटोरे, नंदा तेलगोटे,शारदा राक्षे, राजू कुटकर,

वहिदा शेख, शामशुद्दीन शेख,सुग्रीव नरवटे, दादा भानवसे,सुरेश जाधव, सलीम शेख, राजू पठाण, अंबादास जावळे, फरीद शेख, सहदेव होनमने, रज्जाक शेख सह पदाधिकारी उपस्थित होते.

 यावेळी उपस्थित विक्रेत्यांना अन्नपदार्थ शिजवत असताना घ्यायची काळजी , अन्नपदार्थात वापरणारे तेल च्या सुरक्षिततेबाबत व योग्यते बाबत घ्यावयाची काळजी , त्याचबरोबर अन्न बनवताना जो कच्चा  पदार्थ  आहे त्याचा वापरण्याबाबत योग्य ती माहिती देण्यात आली.

 अत्यंत चांगल्या व सोप्या पद्धतीचे प्रशिक्षण करण्यात आल्याने पथ विक्रेत्यांना  समाधान मिळाले . पथ नाट्याद्वारे ही पथरी, हातगाडी, टपरीधारकांनी अन्नाची सुरक्षा व ग्राहकांची सुरक्षा व स्वच्छ अन्न कशा पद्धतीने द्यावे याबाबत जनजागृती करण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, सांगवी, चिंचवडगाव, भोसरी, आकुर्डी, चिखली, मोशी, देहूरोड, वाल्हेकर वाडी,निगडी ,घरकुल, आकुर्डी  डांगे चौक रावेत आदी परिसरातील विक्रेत्यांनी सहभाग नोंदवला. आज नोंदणी करून प्रशिक्षण घेतलेल्या  फेरीवाल्यांना  लवकरच प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया

रस्त्यावरील विक्रेत्यांचे जीवनमान सुधारावे त्यांना आधुनिक  घडवण्यासाठी म्हणून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे संत गाडगेबाबा स्वच्छ फेरीवाला अभियान आम्ही १०  वर्षापासून यशस्वी राबवले असून आत्तापर्यंत ४३१७  विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले आहे आमचे उद्दिष्ट १०  हजार विक्रेत्यांना प्रशिक्षण देऊन सध्याच्या स्पर्धेत टिकवण्यासाठी तयार करणार आहोत -  कामगार नेते काशिनाथ नखाते

थोडे नवीन जरा जुने