PCMC : लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड कार्पोरेट तर्फे रत्नमाला नामदेव पवार यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

 


पिंपरी चिंचवड - लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड कॉर्पोरेट यांच्या वतीने रत्नमाला नामदेव पवार यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 या गौरवप्रसंगी प्रमुख उपस्थिती लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन रवींद्र काळे व लायन वासंती काळे यांची होती.

कार्यक्रमास शिंदी खुर्द गावचे सरपंच प्रमोद कद्रे, ग्रामपंचायत सदस्य माणिकराव कदम, हनुमंतराव मोहिते, तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील शिक्षकवृंद, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड कॉर्पोरेटचे अध्यक्ष रवींद्र काळे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेसाठी एक लोखंडी कपाट क्लब तर्फे देण्याचे ठरविण्यात आले आहे व त्या शाळेतील दरवर्षी  पाच विद्यार्थी दत्तक म्हणून मी वैयक्तिक घेणार आहे अस जाहीर केले आहे त्यांचा सर्व शालेय खर्च दरवर्षी करणार आहे.



 सातारा जिल्ह्यातील अतिशय दुष्काळी भागातील माण तालुक्यातील सिंधी खुर्द या माझ्या जन्म गावी हा आदर्श शिक्षिका सत्कार आयोजित करण्यात आला, त्या शाळेत मी शिकलो, त्यामुळे मला फारच आनंद झाला आहे. असे रवींद्र काळे म्हणाले.

लायन्स क्लबच्या वतीने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन रत्नमाला नामदेव पवार-मोहिते मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात गावातील नागरिकांनी मोहिते मॅडम यांच्या कार्याची स्तुती केली व त्यांचे योगदान वाखाणले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, ग्रामस्थ आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

थोडे नवीन जरा जुने