PCMC : "अभिराज फाउंडेशन" दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत अव्वल

 

पुणे: पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत अभिराज फाउंडेशनने उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले आहे. इनरव्हील क्लब निगडीतर्फे स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, निगडी येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

​या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील 13 शाळांमधून दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते. अभिराज फाउंडेशनच्या 12 खेळाडूंनी सहभाग घेतला आणि चमकदार कामगिरी केली.

विजेत्या खेळाडूंची नावे:

  • संतोष कोळी: याने सॉफ्ट बॉल थ्रो आणि सॅक रेस या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
  • आराध्या ससाने: सॉफ्ट बॉल थ्रोमध्ये द्वितीय आणि 50 मीटर रनिंगमध्ये तृतीय क्रमांक मिळवला.
  • अमोल हांडे: 50 मीटर रनिंगमध्ये तृतीय आणि जागेवरून उडी मारणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.
  • स्वस्तिक सिंग: सॉफ्टबॉल थ्रोमध्ये तृतीय क्रमांक मिळवला.
  • स्पंदन उघाडे: जागेवरून उडी मारणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

  • या खेळाडूंना क्रीडा शिक्षक विकास जगताप आणि ऋषिकेश मुसूडगे यांनी मार्गदर्शन केले, तर वैशाली खेडेकर आणि अंजना चिगरे यांनी त्यांना सहाय्य केले.

​विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता चव्हाण आणि अभिराज फाउंडेशनचे संचालक स्वाती तांबे आणि रमेश मुसूडगे यांनी त्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.


थोडे नवीन जरा जुने