PCMC : भाजप पिंपरी-चिंचवडतर्फे पं. दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी


​पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मोरवाडी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या मुख्य कार्यक्रमात शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि आमदार अमित गोरखे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

​कार्यक्रमाची सुरुवात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पंडितजींच्या कार्याचा गौरव केला. "पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेले 'एकात्म मानववाद' हे तत्त्वज्ञान आजही आपल्याला दिशादर्शक आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा आणि विशेषतः शेवटच्या व्यक्तीचा विकास हेच त्यांचे उद्दिष्ट होते. याच विचारांवर चालत आज भाजप 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या धोरणाने काम करत आहे," असे ते म्हणाले.

​या सोहळ्याव्यतिरिक्त, भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या निवासस्थानी, संपर्क कार्यालयांमध्ये आणि बुथवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजप शहर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

​यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार अमित गोरखे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस वैशाली खाड्ये, मधुकर बच्चे, नगरसेवक शैलेश मोरे, सुरेश भोईर, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, राजेंद्र बाबर, कोषाध्यक्ष हेमचंद्र मासुळकर, विजय शिनकर, कैलास सानप, गणेश ढाकणे, सलीम शिकलगार, अरुण थोरात, शिवदास हांडे, सीमा बोरसे, सीमा चव्हाण, रवींद्र देशपांडे, नंदूभाऊ भोगले, अतुल इनामदार, गणेश वाळुंजकर, मंडलाध्यक्ष अनिता वाळुंजकर, खंडूदेव कठारे, प्रीतीसिंह परदेशी, गोरख कुंभार, किरण वाल्हेकर, अभिजित बोरसे, सचिन कुलकर्णी तसेच संपूर्ण भारतीय जनता पार्टीमधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने