PCMC : सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पिंपरी चिंचवड पोलिसांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


पिंपरी चिंचवड - सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ च्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात अप्पर पोलीस आयुक्त श्री सारंग आवाड साहेब यांना पोलीस बांधवांसाठी क्रिकेट मॅचेस घेण्यासाठी निवेदन देण्यात आले.

सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ तर्फे पिंपरी चिंचवड पोलिसांसाठी एक आगळीवेगळी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्दिष्ट पोलिस दलातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक ताजेतवानेपणा, सहकार भावना व मैत्रीपूर्ण वातावरण मिळावे हे आहे.

ही स्पर्धा येत्या दसऱ्याच्या नंतर पिंपरी चिंचवड येथील SNBP स्कुलच्या मैदानावर भरवण्यात येणार असून, विविध पोलीस ठाण्यांच्या संघांचा यात सहभाग असणार आहे. विजेत्या संघाला आकर्षक करंडक व पारितोषिके देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहकार्य लाभणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ होणार असून, नागरिकांनी देखील या उपक्रमाला उपस्थित राहून पोलिसांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहर मधून पोलिसांच्या 10 टीम ची मागणी केलेली आहे व दोन दिवसात संपवण्याचे नियोजित आहे असे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांच्याकडून सांगण्यात आले, तरी पुणे टीम ला कामाला लागून हा उपक्रम यशस्वी रित्या राबवायचा आहे ज्याने पूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये संस्थेची ख्याती वाढेल.

दुसरे शहर शांतता कमिटी मध्ये सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ च्या अधिकाऱ्यांना घ्यावे असेही निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदन देण्यात सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात व अमित कोकणे, पिंपरी चिंचवड शहर सचिव विनायक जगताप व सह सचिव मारुती तामवड आणि राजश्री रावडे मॅडम उपस्थित होत्या.सर्व उपस्थितांचे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी कुंभारे यांनी फोन वरून या सदर नियोजनासाठी पुणे टीम ला शुभेच्छा दिल्या.

थोडे नवीन जरा जुने