औद्योगीक क्षेत्रातील नामांकित कंपनी, अस्टमो फाय प्रा. लि.चाकण,पुणे.( पूर्वीचे नाव- केहीन फाय प्रा. लि.) येथे ऐतिहासिक वेतनवाढ करार संपन्न


चाकण - अस्टमो फाय प्रा. लि. चाकण (पूर्वीचे नाव- केहीन फाय प्रा. लि.) आणि ॲस्टेमो फाय कामगार संघटना चाकण यांच्यामध्ये झालेल्या ऐतिहासिक आठव्या वेतनवाढ कराराचे ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

ऐतिहासिक वेतनवाढ करारातील महत्त्वाचे मुद्दे:

​कंपनीचे नाव: अस्टमो फाय प्रा. लि. चाकण, पुणे (पूर्वीचे नाव- केहीन फाय प्रा. लि.)

​कराराचा दिनांक: शुक्रवार, १०/१०/२०२५

​कराराचा कालावधी: ०१/१०/२०२४ ते ३०/०९/२०२७ (तीन वर्षांचा)

​वेतनवाढ आणि आर्थिक लाभ:

​एकूण पगारवाढ: सर्व कामगारांना रु. १७,०००/- (सतरा हजार रुपये).

​नवीन पगार: पगारवाढीनंतर सर्व कामगारांचा पगार आता रु. १,००,०००/- (एक लाख रुपये) होणार आहे.

​पगाराचा रेशो: पहिल्या वर्षी ८०%, दुसऱ्या वर्षी १०%, तिसऱ्या वर्षी १०% मिळणार.

​फरकाची रक्कम: ०१/१०/२०२४ पासूनचे १२ महिन्यांचे फरक दिवाळीअगोदर देण्याचे मान्य.

​वैयक्तिक कर्ज सुविधा: प्रत्येक कामगारास रु. १,२५,०००/- (एक लाख पंचवीस हजार) इतके बिनव्याजी वैयक्तिक कर्ज.

​रात्र पाळी भत्ता: तिसऱ्या पाळीसाठी रु. ७०/- रात्रपाळी भत्ता.

​हिटिंग भत्ता: डाय कास्टिंग विभागात आणि उष्णता असणाऱ्या विभागात प्रत्यक्ष काम करणाऱ्यांसाठी रु. ७०/- हिटिंग भत्ता.

​वार्षिक हजेरी बक्षीस: सध्याच्या रक्कमेत भरघोस वाढ.

​सुट्ट्या आणि विमा/सुरक्षा लाभ:

​पगारी सुट्ट्या:

​PL (Planned Leave) - १५

​SL (Sick Leave) - ०७ (१ ने वाढ)

​CL (Casual Leave) - ०७ (१ ने वाढ)

​PH (Paid Holiday) - ०८

​GPA पॉलिसी (वैयक्तिक अपघात विमा):

​विमा रक्कम रु. १० लाखांवरून रु. १४ लाख करण्यात आली.

​अपघात काळात गैरहजेरीसाठी आठवड्याला मिळणाऱ्या रक्कमेत रु. ४०००/- ने वाढ करून रु. १०,०००/- करण्यात आली.

​कायमस्वरूपी अपंगत्त्व लाभ: कायमस्वरूपी अपंगत्त्व आल्यास, कामगारास रु. ३,९०,०००/- आणि सर्व कामगारांचा एक दिवसाचा पगार.

​मृत्यू सहाय्य योजना: कामगाराचा मृत्यू झाल्यास, सर्व कामगारांचा व सहभागी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार आणि कंपनीकडून रु. १५ लाख वारसास दिले जातील.

​इतर सुविधा:

​कँटीन सुविधा: आठवड्यातून एकदा नाष्ट्यासाठी अंडी आणि आठवड्यातून एकदा जेवणात अंडाकरी.

​बस सुविधा: तळेगाव बस मार्गांवर सेकंड शिफ्ट मध्ये शिफ्टनुसार बस सुविधा.

​इतर सुविधा: तीन वर्षातून एकदा उच्च प्रतीचे टू-इन-वन जर्किन (करारा निमित्त).

​शैक्षणिक गौरव योजना: कामगारांच्या मुला-मुलींसाठी १०वी, १२वी, NEET, JEE परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक श्रेणीतील प्रथम तीन विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव.

​सेवा पुरस्कार: २५ वर्षे सतत सेवा पूर्ण करणाऱ्या कामगारांना स्मृतिचिन्ह, प्रशंसापत्र व योग्य सन्मान.

​सेवा निवृत्ती भेट: सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांना शाल, श्रीफळ, प्रशंसा प्रमाणपत्र आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल.

​अनुकंपा सेवा लाभ: मृत, निवृत्त झालेल्या किंवा निवृत्ती घ्यावी लागलेल्या कामगारांच्या मुला-मुलींना कंपनीच्या निवड प्रक्रियेत नोकरीसाठी निवड झाल्यास प्रथम प्राधान्यक्रम.

​करारावर सह्या करणारे प्रमुख पदाधिकारी:

​संघटना प्रतिनिधी: श्री. जीवन येळवंडे (संस्थापक अध्यक्ष आणि कामगार नेते), श्री. भटु पाटील (उपाध्यक्ष), श्री. कालीदास कान्हुरकर (उपाध्यक्ष), श्री. सुरेश उंबरकर (सरचिटणीस), आणि इतर सदस्य.

​व्यवस्थापन प्रतिनिधी: श्री. सुधीरजी गोगटे साहेब (वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक), श्री. गजानन शेलार साहेब (प्लॅन्ट हेड), एच आर हेड श्री. संपत फडतरे, आणि इतर व्यवस्थापनातील अधिकारी.


थोडे नवीन जरा जुने