आळंदीत पथनाट्यातून विविध कायद्यांचे मार्गदर्शन उत्साहात; स्त्री भ्रूणहत्या रोखण्याचे आवाहन

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदीत आय एल एस लॉ कॉलेज पुणे यांचे तर्फे जनजागृती उपक्रमांतर्गत पथनाट्यातून विविध कायद्यांचे मार्गदर्शन आणि प्रतिबंधात्मक उपाय योजनांना दक्षता घेण्यासाठी सादरीकरण उत्साहात करण्यात आले. 

   या जनजागृती अभियान प्रसंगी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर, प्रा. डॉ. सुवर्णा निलख, प्रा. डॉ. वर्षा खंडागळे, प्रा .दिव्या मित्तल, प्रा.मीर अली, अभिषेक रंधवे, संदीप  रंधवे, आवेकर भावे रामचंद्र संस्थान आळंदी विश्वस्त अर्जुन मेदनकर, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांचे सह नागरिक, शालेय विद्यार्थी, आळंदी नगरपरिषद कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.    

या मध्ये बालविवाह, घरगुती हिंसा, शिक्षण आधी, स्वावलंबन आधी यासाठी शिक्षणाची दीक्षा प्रथम, स्त्री भ्रूण हत्या, विंचू चावला या गाण्यातून जनजागृती करण्यात आली. अलीकडच्या काळात मुलींचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृती करीत यदे विषयक माहिती देण्यात कायद्यायचे शिक्षण घेत असलेल्या युवक, युवतींनी देत उपस्थितांशी संवाद साधला. बालविवाह प्रतिबंध कायद्या विषयी जनजागृती करण्यात आली. बालविवाह हा मुला मुलीचा ही होतो. मात्र ते बेकायदेशीर आहे. याचे यावेळी दुष्परिणाम काय आहेत. या बाबत माहिती देण्यात आली. शारीरिक, मानसिक हिंसा होत असल्याने गुन्हेगारांना कायद्याने शिक्षा होत असल्याचे सांगत दक्षता घेण्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. लैंगिक गुन्हे या पासून बालकांचे संरक्षण कायदा या बाबत माहिती देत घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी प्रबोधन उत्साहात झाले.

 यावेळी विविध कारणासाठीच संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले. पथनाट्य सादरीकरणातून युवक, युवतींनी उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी आयएलएस विधी कॉलेज पुणे यांचे वतीने जनजागृती करीत कायद्याची भीती आणि अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न, मोफत कायदेशीर सल्ला आणि मदत तसेच निवडक कायद्यांची माहिती देण्यात आली. गेल्या पन्नास वर्षांपासून विधी जनजागृती कार्य हे सेवाभावी पणे मदत आणि सल्ला या स्वरूपात केले जात असल्याचे ही दिला जातो. असे प्रा. डॉ. वर्षा खंडागळे यांनी सांगत शेवटी शपथ देत आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी मार्गदर्शन केले.

थोडे नवीन जरा जुने